राज्यातील रखडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पूव निवडणुका घेण्याचे आदेश निवडणुक आयोगाला दिल्याने आता आगामी सर्व निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. यानुसार 27 ऑक्टोबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होईल यानुसार डिसेंबर 2025 मध्येच जिल्हापरिषद निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने आगामी निवडणुकांमध्ये नक्की काय घडणार ? आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊ ली कटकेंना जनता साथ देणार? की माजी आमदार ॲड.अशोक पवार पुन्हा नवी रणनिती समोर ठेवत सत्ता काबीज करणार, उत्सुकता सर्वांनाच, कोण प्रभावी ठरणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चित !
वास्तविक आपल्या आमदारकीच्या यशस्वी कारकिदत ॲड.अशोक पवार यांनी मोठया गतीने शिरुर-हवेलीच्या विकासकामांना चालना देऊ न असंख्य महत्वपूर्ण कामे उभी केली होती तसेच कार्यसम्राट आमदार म्हणून आपली एक प्रभावी प्रतिमा समाजात निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले होते, याचं बळावर असंख्य कार्यकर्त्यांचे पाठबळ, त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांचे मोठे वलय त्यांच्या भोवती भक्कमपणे उभे होते, परंतु सत्तेच्या ओघात एकेक स्थानिक नेता त्यांच्यातील आततायीपणाचा शिकार होत गेला आणि यातूनचं नाराजीचा सूर वाढत राहीला, आपल्यामागे विकासकामे आहेत ही एकमेव प्रभावी भावना त्यांच्या मनात होती, याचं बळावर जनता त्यांच्या मागे भक्कपणे उभी राहील याची त्यांना खात्री होती, परंतु स्थानिक नेत्यांची प्रचंड नाराजी वाढत गेली आणि शेवटी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दूरदृष्टीचे नेते व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्यात दुफळी निर्माण झाल्यानंतर मात्र विरोधकांना आयती संधी चालून आली आणि पवारांचे विश्वासू सहकारी शिरुर तालुका राष्ट्रवादीचे तत्कालीन तालुकाध्यक्ष रवि काळे माजी आ.अशोक पवारांच्या विरोधात बंड करीत बाहेर पडले, यामुळे त्यांच्यापाठोपाठ बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, शिक्रापूरचे माजी उपसरपंच धैर्यशील ऊर्फ आबाराजे मांढरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे असे एकेक करुन महत्वाचे सर्वच स्थानिक नेते पवारांपासून दूर गेले आणि याचाच फायदा आमदार कटकेंना झाला, त्यामुळे आगामी निवडणुकांतही या सर्व स्थानिक नेत्यांचा भक्कम पाठींबा जर असाच आ.कटके यांच्या मागे उभा राहीला तर पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपरिषद व महानगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्ये आ.कटकेंना फायदा होईल असे बोलले जात आहे, परंतु पुन्हा नव्याने माजी आमदार अशोक पवार काही आपल्या छुप्या राजकीय डावपेचांचे समीकरण समोर ठेवत सत्ता काबीज करण्यासाठी नव्याने उभारी घेतली का ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे, परंतु बलाढ्य स्थानिक नेत्यांचे आव्हान स्विकारणे सोपे नसल्यानेही पवारांना ही निवडणुक अवघड जाईल अशीही चर्चा आहे.
आमदार ज्ञानेश्वर ऊ र्फ माऊ ली कटके यांनी शिरुर-हवेली विधानसभा निवडणुकीत 1 लाख 92 हजार 281 मते हस्तगत करीत 74 हजार 550 मतांची विक्रमी आघाडी घेत माजी आमदार ॲड.अशोक पवार यांचा पराभव केला होता, इथे पवार यांना 1 लाख 17 हजार 731 मते मिळाली, अर्थातच आमदार कटके यांनी 59.88% मते घेतली तर पवार यांना फक्त 36.67 % मतांवरच समाधान मानावे लागले होते, सर्व स्थानिक नेत्यांचे पाठबळ आ.कटके यांना मिळाल्यानेच जनतेनेही आ.कटके यांना स्विकारले. याचं पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये नक्की काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








