
शिरूर शहरातील सूरज नगर भागात बिबट्याचा वावर आढळल्याने वनविभागाने लावला पिंजऱ्याचा ट्रॅप
शिरूर : (मदन काळे) शिरूर शहरातील सूरज नगर जवळील सुशीला पार्क मध्ये अचानकपणे सलग दोन दिवस बिबट्या आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिरूर तालुक्याचे वनअधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी तातडीने आदेश देऊन वनसंरक्षक गणेश झिरपे व त्यांचे सहकारी रोहिदास शेंडगे, सुधीर शितोळे यांनी संबंधित भागात पिंजऱ्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता







