संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

शिरुर शहर व तालुका गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतोय, हायवेवरचा भाग असल्यानं महाराष्ट्राचं लक्ष्य वेधून घेतोय !

SHARE:

शिरुरची माणसं माणूसकीप्रधानं, आपलेपणा जपणारी आणि सर्वांना सामावून घेणारी असल्यानेच आज तालुक्याचा कोणताही भाग घ्या, प्रत्येक भागात सर्व समावेशक लोक आढळून येतात, किंबहुना कोरेगाव, शिक्रापूर, तळेगाव, रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी या ग्रामीण शहरांचा विचार केला असता बाहेरचे लोक जास्त आणि स्थानिक कमी अशी शिरुरची अवस्था झालीय, एकुणचं काय तर आता देशभरातील विविध भागातील लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने शिरुरला प्राधान्य देताना दिसून येतात. महत्वाचं म्हणजे हायवेवरचं गांव असल्यानं सर्वच राज्यातून इथे सहज वाहतुक व्यवस्था उपलब्ध होते, म्हणूनचं शिरुर तालुका सर्वांसाठी सुरक्षित मानला जातो. किंबहुना जातीय सलोखा राखण्यात आजपर्यंत शिरुरने नेहमीच आघाडी घेतली आहे. हा शिरुरचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, आंधप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, बिहार, दिल्ली अशा सर्वच भागातील विविध अधिकारी, कामगार वर्ग इथे सहजपणे दिसून येतात. रांजणगाव औद्योगिक परिसरात तर बाहेरील कामगारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे साहजिकच शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव, करडे या भागातील वाढते औद्योगिकरण यामुळे व्यवसाय वा नोकरी निमित्ताने असंख्य लोक सध्या शिरुरला प्राधान्य देत असल्यानेचं बहुतांश नागरीकांचा ओढा शिरुरकडे दिसून येतो. विविध भागातील लोकांची निवृत्तीनंतर कायमस्वरुपी स्थायीक होण्यासाठीही शिरुरला पसंती मिळताना दिसून येते. म्हणूनचं गुंतवणुकदारांचा ओढाही शिरुरकडे दिसून येतो. प्रशस्त जागा घेतली, खोल्या बांधल्या तर लाखो रुपयांचे भाडे इथे सहज मिळते. त्याचबरोबर जागेत गुंतवणुक केली तर सहा ते सात वर्षात दुप्पट पैसे हाती येतात, असा गुंतवणुकदारांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्राला शिरुर परिसरातून प्रचंड चालना मिळते आहे. अहिल्यानगर-पुणे हायवेवरचा हॉटेल व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. शिड-औरंगाबाद आणि गुजरातकडे जाणारी मंडळीही वाघोली ते शिरुर दरम्यान जेवणासाठी आवर्जून थांबतात आणि चांगल्या व क्वालिटी जेवणाचा आस्वाद घेतात. त्यातल्या त्यात हा संपूर्ण हायवे हॉटेलींगसाठी प्रसिध्द मानला जातो. त्यामुळे इथे हॉटेल व्यवसायाला मोठा प्रतिसाद दिसून येतो.
पुण्या-मुंबईकडील सेवानिवृत्त लोकही आता शिरुरकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. शिरुर शहर वगळता परिसरात जागांचे दर आजही आवाक्यात आहेत तर एमआयडीसी व शिक्रापूर परिसरात अनेकांनी अगदी बजेटमधील प्लॉट ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. शिरुर शहरातही जागांचे भाव गगनाला भिडले असतानाही ग्राहक मात्र बिनधास्तपणे गुंतवणुक करताना दिसून येत आहेत. नोटबंदी व कोरोनानंतर प्लॉटींग व बिल्डर्सना मेोठा फटका बसला होता, पण सध्या मात्र या भागात गुंतवणुकदारांची संख्या मोठी असल्याने जिथे योग्य दर आहेत तिथे आजही मोठी गुंतवणुक होताना दिसून येत आहे. किंबहुना मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. आज केलेली गुंतवणुक उद्या फायद्याची ठरणार आहे, याची कल्पना गुंतवणुकदारांना असल्यानेचं शिरुर शहरासह तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात मोठे गुंतवणुकदार सध्या शिरकाव करताना दिसून येत आहेत. शिरुर परिसरातून चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत. सर्वोत्तम दर्जाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. शहर असूनही पुण्या-मुंबई सारखी महागाई इथे नाही. म्हणूनचं शिरुरला अधिक प्राधान्य मिळताना दिसून येत आहे. याचं अनुषंगाने गुंतवणुकदारही शिरुरकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसून येत आहेत.त्यामुळे शिरुर व परिसर गुंतुवणुकीसाठी सर्वेात्तम पर्याय ठरत आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment