नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भिमराव कांबळे याला नेमकी काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेले असताना नुकतीच न्यायालयाने या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्याने पुणे ग्रामीण पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या तपासात शिरुर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी दाखविलेली कार्यतत्परता, या गुन्हयाचा सखोल तपास करुन बजावलेली अत्यंत महत्वाची भूमिका यामुळेच नराधम कांबळे फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचल्याने झेंडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नराधम कांबळे याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी
तपासादरम्यान आरोपीविरुध्द भक्कम पुरावे गोळा करणे, कायदेशीरप्रक्रीया अत्यंत काटेकोरपणे पूर्ण करणे, तपासाची साखळी मजबूत ठेवणे याबाबतीत विशेष खबरदारी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविला गेल्यामुळे21 मे पासून याची प्रत्यक्षात सुनावणी सुरु झाली. विशेष म्हणजे
पोलिसांकडून तातडीने सखोल आणि अचूक तपास करुन 16 दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यात महत्वाच्या साक्षी पुराव्याची नोंदही करण्यात आली.
या केसचा संपूर्ण युक्तीवाद केवळ 20 दिवसांत पूर्ण करण्यात आला तर
55 जणांच्या साक्षींची नोंद यावेळी घेण्यात आली.
या प्रकरणाचे आणखी एक विशेष म्हणजे 1200 पानी दोषारोपपत्र दाखल केले गेले तर 137 पानी निकालपत्र समोर ठेवण्यात आले.
नसरापूर येथील ही अत्यंत निंदणीय घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून नराधम कांबळे विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. किंबहुना त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती, याचीच दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे आदेश दिले आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यतत्परतेने अत्यंत जलद गतीने त्याचा निकालही आता जनतेसमोर आल्याने सर्व स्तरातून याचे कौतुक होत आहे. नराधम कांबळे सारखे धाडस समाजात पुन्हा कुणीही करु नये यासाठीच हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जात आहे, दिवसें दिवस बालअत्याचार आणि हत्येच्या घटना सतत समोर येत असताना या निकालाला अत्यंत महत्व आहे
Author: Sanvad Vahini
Post Views: 16







