संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

स्मार्ट मीटरच्या विरोधात शिरुरकर एकवटले अवाजवी बिले येत असल्याने ग्राहक संतापले

SHARE:

शिरुर शहरात स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरु असताना मीटर बसविलेल्या जवळपास सर्वच ग्राहकांना अवाजवी अर्थातच दुप्पट,तिप्पट वीजबिले आकारली गेल्याने ग्राहकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. याचीच दखल घेत शिरुर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिरुरनामा या वेब पोर्टलचे प्रमुख प्रविण गायकवाड यांनी शिरुर शहरातील वीज ग्राहकांना संघटीत करुन या मनमानी विरोधात मोठा लढा उभारला आहे. या लढ्याला माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माधव सेनेचे रविंद्र सानप, मनसेचे महेबूब सय्यद, प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली चव्हाण (कटके) शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी मयूर फुलफगर, रमणलाल भंडारी, मृणाल बाफना, प्रविण मुथा यांसह शिरुर शहरातील नागरीकांचाही या लढ्याला भक्कम पाठबळ मिळत आहे, नुकतेच स्मार्ट मिटरला तिव्र विरोध करण्यासाठी शिरुरमधुन विज वितरण कंपनीसमोर मोर्चाचेही अयोजन करण्यात आले होते, मात्र संघटीत झालेल्या या वीज ग्राहकांचे कोणतेही म्हणणे वीज वितरण कंपनीकडून ऐकून घेतले जात नसल्याने गायकवाड यांनीही संताप व्यक्त केला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरुच राहील अशी भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटरला सध्या राज्यभरातून जोरदार विरोध होत आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment