संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

भेंडी सगळ्यात भारी,आरोग्यदायी अन्‌‍ मधुमेहींसाठी गुणकारी !

SHARE:

भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे, भेंडीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असल्याने निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म भेंडीमध्ये आहेत, यामध्ये वसा, रेशा, कार्बोहाइड्रेडस्‌‍, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम पोटॅशियम, सोडीयम यासारखे जीवनसत्व असल्याने मनुष्याचा एक परिपूर्ण आहार म्हणूनही भेंडीकडे पाहीले जाते.मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडीही अत्यंत लाभदायी मानली जात आहे, मधुमेहासाठी दोन भेंड्या घ्या, त्यांची दोन्हीही शेवटची टोके कापून टाका, मध्ये एक उभा छेद करा, एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात दोन्हीही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा, सकाळी उठल्यानंतर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊ न घ्या, पंधरा दिवस हा उपचार केल्याने साखरेच्या प्रमाणात लक्षणीय घट होते व मधुमेहींना आराम मिळतो.भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते, आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करुन माणसाला निरोगी ठेवते, भेंडीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यात व्हिटामीन सी हे जीवनसत्व आहे, त्यामुळे माणसातील इम्युनीटी सिस्टमची ताकद वाढवून खोकला, थंडी यापासून बचाव करते, यातील व्हिटामीन ए जीवनसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते. म्हणूनचं भेंडी खा, निरोगी रहा बरं यासाठी खास कुठे जाण्याची गरज नाही, भेंडी सहजपणे कुठेही उपलब्ध होते.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment