संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

मुंढेंच्या धास्तीने भेसळखोर हादरले फुडची गुणवत्ता वाढली, माफीयाही नरमले कारवाईच्या भितीने हॉटेल चालकही धास्तावले

SHARE:

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्विकाल्यानंतर तातडीने या क्षेत्रातील बनवेगिरी सर्वांसमोर उघड करीत भेसळ माफीयांचा पदार्फाश केल्याने मुंढेे साहेबांची प्रचंड दशहत आता भेसळ माफीयांवर निर्माण झाल्याने बाजारात आता सर्वोत्तम दर्जाचे दुध तर चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ उपलब्ध होवू लागल्याने सर्वसामान्य नागरीकांमधुन मुंढेे साहेबांच्या या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे. तसेच हॉटेल चालकांबाबतीतही अत्यंत कठोर नियम समोर ठेवत ग्राहकांना सर्वेात्तम सेवा देण्याच्या दृष्टीने आदेश पारीत केल्याने हॉटेल व्यावसायीकही कारवाईच्या भीतीने चांगलेच धास्तावले आहेत एकुणच सध्या सर्वत्र मुंढेंच्या धास्तीने भेसळखोर हादरले, फुडची गुणवत्ता वाढली, माफीयाही नरमले, कारवाईच्या भीतीने हॉटेल चालकही धास्तावले असे चित्र सर्वत्र अनुभवायस मिळत आहे.
वास्तविक पाहता अहिल्यानगर जिल्हा हा भेसळीच्या बाबतीत आघाडीवर आहे, अनेकदा या जिल्ह्यातील भेसळीचे अनेक कारनामे वेळोवेळी जनतेसमोर उघड झाल्याने मुंढेंनी आपला पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदा अहिल्यानगर जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आणि या भेसळ माफीयांना मोठ्या कारवाईनिशी जरब देखील बसविली आहे. शिरुर तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरचा महत्वाचा तालुका मानला जात असल्याने इथेही या भेसळची लागण झाल्याचे पहायला मिळाले. शेकडो किलो भेसळयुक्त खवा अज्ञातांनी फेकल्याचा अनुभव समोर आला,तर घोडनदी किनारी एक्पायरीचा माल फेकून दिल्याचेही समोर आले. मुंढे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र भरातून आजतागायत 904 ठिकाणी छापे टाकले. 322 आस्थापने/दुकाने सील केली आणि काही कारवाईच्या कक्षेत आणली. 457 जणांवर थेट अटकेची कारवाई केली. या कारवाईत सुमारे 42 वाहने जप्त करण्यात आली. यात काही मोठ्या हॉटेल व्यावसायीकांचा व नामवंत डेअरी उत्पादकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे आता भेसळखोरांनी सध्यातरी मुंढेे साहेबांची प्रचंड धास्ती घेतल्याने बाजारात दुधाच्या क्वालिटीत सुधारणा दिसून येत आहे तर अन्नपदार्थांची चवही अचानकपणे बदलली आहे. देवाच्या चरणी विसावणारे पेढेही आता गुणवत्तापूर्ण मिळू लागल्याने पूजेलाही हेल्दी स्वरुप प्राप्त झाले आहे. वारंवार तळलेले वापरले जाणारे तेल, अन्नपदार्थात होणारी भेसळ सध्यातरी थांबली आहे, हॉटेल व्यावसायीकांनीही आता या कारवाईच्या भीतीने आपल्या गुणवत्तेत सुधारणा केल्याचे चित्र अनुभवायला मिळाले आहे.

मे महिन्यात अन्न व औषध प्रशासन अर्थातच एफडीएचे आयुक्त म्हणून कार्यक्षम व जिगरबाज अधिकारी तुकाराम मुंढेे यांनी पदभार स्विकारल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भरातून तातडीने या विभागाची माहिती संकलीत केली आणि हाती आलेले धक्कादायक वास्तव जनतेसमोर आणत भेसळ माफीया, गुटखा माफीया, बनावट औषधांचा व्यापार करणारे माफीया, हॉटेल व्यावसायीक, दूध डेअरी, फुड विक्रेते यांना टार्गेट करीत अक्षरश: अनेक भागातून बनावट गिरीचा पर्दाफाश करुन असंख्य माफीयांवर कडक कारवाई करीत दुकाने व हॉटेल्स सिल केली तर काही बड्या कंपन्यांवरही थेट कारवाई करीत अन्न औषध प्रशासन यापुढे भेसळगिरी खपवून घेणार नाही असा सणसणीत इशाराच संपूर्ण महाराष्ट्राला दिल्याने मुंढेे साहेबांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामुळे मात्र भेसळखोर हादरले,माफीया नरमल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment