संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

कल्पनांपेक्षा कृतीला महत्व द्या नक्कीचं प्रगती होईल जे झालेच नाही ते सांगण्यात अर्थ काय? यशस्वी झाल्यावर हेच जग डोक्यावर घेईल !

SHARE:

वॉरेन बफेट म्हणतात तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम होईल.
वॉरेन बफेट जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून ओळखले जातात, म्हणूनच त्यांच्या या विचारांना विशेष महत्व आहे. शेअर मार्केट मध्ये सर्वाधिक गुंतवणुक असणाऱ्या या प्रभावी व्यक्तीमुळे अनेकदा शेअर मार्केटवर मोठा परिणाम होतो, म्हणूनचं बफेट यांच्या या संदेशाकडे आपणही सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. आपण समाजात वावरताना आणि सामाजिक जाणीवेचे भान ठेवून आपले आयुष्य जगत असताना, आपल्या आजूबाजूला असंख्य माणसांची गद दिसून येते, जनमाणसात वावरत असताना आपण माणसांना टाळूचं शकत नाही, यामध्ये आजूबाजूला असणारा आपला मित्र परिवार, नातेवाईक आपले हितचिंतक, ग्राहक, कलिग म्हणून आपल्या या जीवन प्रवासात असंख्य माणसे आपल्याला सतत भेटत असतात, पण यातील प्रत्येक माणूस आपले हित जोपासणारा असेलच असे नाही, आजच्या या स्पर्धेच्या युगात, जो तो स्वत:ला सिध्द करण्यासाठी एकमेकांचे पाय खेचत या स्पर्धेत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो, मात्र आपल्या या कृतीमुळे समोरच्याचे लाईफ धोक्यात येणार आहे याचा कुणीही विचार करताना दिसत नाही, म्हणूनचं जे घडणार आहे ते आपण कधीही टाळू शकत नाही, आपण काळजी मात्र नक्कीचं घेवू शकतो, म्हणून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा, आपले योग्य टार्गेट सेट करा, त्याचे परफेक्ट नियोजन करा, आपण आपल्या क्षेत्रातील स्पर्धा, त्या क्षेत्रात असणारी आव्हाने, तिथे जागतिक स्तरावर, स्थानिक पातळीवर अथवा आपल्या कार्यक्षेत्रात असणारा वाव याचा विचार करुन अचूक स्टॅटीजी बनवा, याबाबत आपली रचना करताना फोकस फक्त कामावर असू द्या, आपल्याला अनेकदा वाटतं आपल्या मनातील सर्वोत्तम संकल्पना आपण इतरांसमोर मांडल्यास त्याचे कौतुक होईल वा योग्य मार्गदर्शन मिळेल, यामुळे प्रोत्साहन मिळेल, पण मित्रांनो तो काळ आता गेला, आता आपल्यापेक्षा कुणी मोठं नकोय,याच विचारांनी पाय ओढणाऱ्यांची संख्या अधिक वाढते आहे, म्हणूनचं आपल्याला जीवनात सक्सेस मिळवायचा असेल तर व्यस्त रहा, सर्वोत्तम नियोजन करा, गुप्तता पाळा,परफेक्ट नियोजनावर भर द्या, स्वत:च्या चुका शोधा, पुढे जा उगीचचं जे झालेच नाही ते सांगण्यात काहीचं अर्थ नाही आणि जे होणार आहे ते झाल्यावर दिसणार आहे, हाचं सध्या सुखी जीवनाचा व यशाचा खरा मूलमंत्र आहे असे म्हटल्यास ते वागे ठरु नये.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment