शिरुर,श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था आज आपल्या गुणवत्तेमुळे वर्षानुवर्षे टीकून आहेत, परंतु बालाजी शिक्षण संस्थेने संस्कार,गुणवत्ता आणि सर्वोत्तम यशाचा संकल्प करुन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठा आत्मविश्वास निर्माण केल्याने या संस्थेने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी व आपलेपणाचे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचे चेअरमन सदाशिव (अण्णा) पवार यांनी 2009 साली शिरुर शहरातील यशवंत कॉलनी येथून अवघ्या 22 विद्यार्थ्यांपासून सुरु केलेली ही संस्था आज 2200 हून अधिक विद्यार्थ्यांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली आहे. कात्रज डेअरीच्या मा.चेअरमन सौ.केशरताई पवार, शिरुर बाजार समितीचे मा.सभापती प्रकाशबापू पवार तसेच सुरेशनाना पवार यांच्या अमूल्य सहकार्याने व पुढाकाराने ही संस्था आता नावारुपास आली आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या आवडीनुसार शाळाबाह्य उपक्रमांचीही इथे रचना केल्याने हसत खेळत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची मोठी प्रगतीही साध्य होताना दिसून येतेे आहे, म्हणूनच इथल्या शिक्षण पध्दतीविषयी पालकांमध्ये समाधान दिसून येते. बालाजी इंग्लीश स्कूल मिडीयम स्कूल (सीबीएसई) तसेच बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (सेमी इंग्लीश) या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्याथ शिक्षण घेत आहेत. इथे पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक, बौध्दीक,मानसिक व शारीरीक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असतानाच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्वगुण आणि सकारात्मक विचार सरणी विकसीत करण्यासाठी येथील व्यवस्थापन सातत्याने प्रयत्न करीत आहे. या संस्थेचा परिसर 4 एकर या प्रशस्त जागेत विस्तारलेला असल्याने सर्व खेळांमध्ये इथले विद्याथ विशेष नैपुण्य मिळविताना दिसून येतात. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, नवोद्य प्रज्ञाशोध, ऑलिम्पियाड, विज्ञान प्रदर्शन, क्रिझ, चित्रकला, संगीत, नृत्य स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 20 हून अधिक गावांपर्यंत बस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. संस्थेत डिजीटल शिक्षण, स्मार्ट क्लासरुम, प्रत्येक वर्गात इंटरॲक्टीव्ह पॅनल, संगणक कक्ष,विज्ञान व भाषा प्रयोगशाळा, रोबोटीक्स कोडींग, एआय यांसारख्या अत्याधुनिक सुविधा इथे उपलब्ध आहेत. तसेच इथे जर्मन,जपानी या भाषा शिकविल्या जातात. इथे जागतिक पातळीवरील स्पर्धेत टीकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून खास तयारी करुन घेतली जात आहे. प्राचार्य विठ्ठल तुपे व प्राचार्य विनायक म्हसवडे यांनी या संस्थेला नेहमीच प्रगतीपथावर ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.








