सखे, तुझ्याबद्दल काय लिहावं, कुठून सुरुवात करावी खरचं कळत नाही, रात्रं-दिवस तुझ्याचं विचारांमध्ये हरवलेला मी, तुझ्या नुसत्या आठवांनीही भारावून जातो. असं वाटतं माझ्या ह्द्याच्या देव्हाऱ्यात तुझी असणारी ती सुंदर प्रतिमा दूर कधी जावूच नये. तुझ्या नुसत्या विचारांनीही मन अगदी प्रसन्न होवून जातं. तुझ्याबद्दल खुप काही वाटतं पण खरं सांगू तू समोर आल्यानंतर तुला सांगण्याचं धाडसचं होत नाही, अचानकपणे तू समोर येतेस तेंव्हा माझे शब्द अबोल होतात, मनातल्या भावना दाटून येतात पण सारं काही समोर ठेवण्याचं धाडसचं होत नाही, म्हणूनचं तू समोर असतेस तेंव्हा मी पूर्णपणे नि:शब्द होतो. तुझ्या नजरेत डोकावताना तू माझ्यासाठी किती आतुर असतेस मी अनेकदा जाणलंय, यावेळी तुझं हलकस नजर चोरुन पाहणं आणि हळूवार हसणं बरचं काही सांगून जातं,
एक सांगू, मनाने तू इतकी सुंदर आहेस की, तुझ्यातील निर्मळता पाहून मला तुझा नेहमीच हेवा वाटतो. तू नेहमी खरं बोलतेस, तुला खोटेपणाचा प्रचंड राग आहे, मला माहितीय बाह्य सौंर्द्याला तुझ्या नजरेत शुन्य किंमत आहे, म्हणूनचं तू कधीही सुंदर मुला-मुलींना भाव देताना दिसत नाहीस, पण तू स्वत: मात्र मनाने अन् सौर्द्याने इतकी सुंदर असूनही कधी तुझ्या सुंदरतेवर गर्व केला नाहीस वा कधी त्याचा तोराही मिरवला नाहीस, तुझ्यातील माणूसकी मला प्रचंड भावते, तुझ्यातील आपलेपणा माझ्या हृद्यात नेहमीचं घर करुन राहतो, तुझ्यातील भावुकता मनाला नेहमीच भिडते म्हणूनचं खरं सांगतो प्रिये तू मला नेहमीचं आपलीशी वाटतेस, खरं सांगू मी तुझ्या सौंर्द्यावर कधीच प्रेम केलं नाही, तुझ्यातील खरेपणा मला प्रचंड भारावून टाकतो, यामुळेचं तुझ्याविषयीचं प्रेम आणखी घट्ट होतं, मी तुझ्यातील माणूसकीवर प्रेम केलं आहे, म्हणूनचं तू मला अधिक भावतेस आणि आवडतेस, खुप दिवसांपासून तुझ्यासमोर मनातलं सारं काही मांडण्याची मनापासून इच्छा होती, पण मी तुला मनातलं सांगितल्यानंतर तू तुझ्या अंत:करणात मला कायमच ब्लॉक करु नये एवढीच मनात भीती आहे. मीअनेकदा प्रयत्न केलाही तुला सांगण्याचा पण धाडसचं झाले नाही, म्हणूनचं आज या पत्राद्वारे तुला मनातलं सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, तू मला खुप-खुप आवडतेस, माझं तुझ्यावर मनापासून प्रचंड प्रचंड प्रेम आहे, म्हणूनचं मी तुझ्या होकाराच्या प्रतिक्षेत आहे. पण प्लीज नाराज होवू नकोस, माझ्यापासून दूर जावू नकोस, तुझ्या मनात माझ्याबद्दल होकार असेल तर खुप आनंद होईल, पण नकार असेल तर प्लीज अशीचं बोलत राहा, पण दूर जावू नकोस, प्लीज फक्त एका होकाराची अपेक्षा आहे!








