शिरुर : शिरुर शहरातील शिरुर क्रीटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने दि.3,4 आणि 5 सप्टेंबर 2026 रोजी हाडांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी शिबीर अर्थातच ऑस्टीओपोरॉसिस कॅम्प या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात हाडातील कॅल्शियम + व्हिटामिन डी-3, या 800 रुपयांच्या टेस्ट सवलतीच्या दरात फक्त 300 रुपयांत केल्या जाणार आहेत. हाडांच्या आजारांसंदर्भातील योग्य मार्गदर्शन फक्त 200 रुपयांच्या फीमध्ये केले जाणार आहे. हाडांची घनता तपासणी मूल्य एक हजार रुपये आहे मात्र ही तपासणी पूर्णत: मोफत केली जाणार आहे.तर एक्स-रे वरती रुग्णांसाठी या शिबीरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबीरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना जर ऑपरेशनची गरज असेल तर यावर 20 टक्के थेट सवलत दिली जाणार आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते सायं.5 अशी असणार आहे.
Author: Sanvad Vahini
Views: 85







