संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

15 वर्षाच्या तरुण क्रिकेटरने जगाचे लक्ष वेधले जोरदार फलंदाजीने आयपीएलचे मैदान गाजवले वैभव सुर्यवंशीच्या प्रभावी कामगिरीने क्रिकेटविश्वात नव्या क्रिकेट स्टारचे आगमन झाले

SHARE:

भारतीय क्रिकेटमध्ये एका युवा क्रिकेटरची सध्या जोरदार चर्चा आहे,किंबहुना तो क्रिकेट रसिकांच्या मनातील ताईत बनला आहे, कारण आहे त्याचे वय आणि तुलनेत त्याने क्रिकेट क्षेत्रात त्याची जगासमोर ठेवलेली अभूतपूर्व अशी कामगिरी. अवघ्या 15 वर्षांचा हा तरुण क्रिकेटर आता क्रिडाप्रेमींच्या दिलकी धडकन बनत आहे, या क्रिकेटरचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने 2026 या हंगामात सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून सध्या तो क्रिडाप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रारंभीचा प्रवास आणि पार्श्वभूमी
वैभव सूर्यवंशी मुळचा बिहार मधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूरचा, सर्वसामान्य कुटंबात त्याचा जन्म झाला. वयाच्या 4 थ्या वर्षापासून त्याला क्रिकेटच्या वेडाने अक्षरश: पछाडले आणि याचं ध्येयाने प्रेरीत होऊ न त्याने मोठा क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहीले. आपल्या या क्रिकेट प्रवासात सुरुवातीच्या काळात त्याचे वडील संजीव सुर्यवंशीच त्याचे कोच बनले आणि त्याला क्रिकेटचे अचूक धडे दिले. वयाच्या 9 व्या वष त्याने क्रिकेट ॲकॅडमीत प्रवेश घेऊ न क्रिकेट मधील नैपुण्य प्राप्त केले.
लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. शालेय जीवनातच त्याने आपल्या फलंदाजीची छाप उमटवायला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्याने धावा करत त्याने प्रशिक्षक आणि निवड समितीचे लक्ष वेधले. आर्थिक आणि स्पर्धात्मक अडचणींवर मात करत त्याने आपल्या कौशल्यावर मेहनत घेतली आणि क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्धार कायम ठेवला
घरगुती क्रिकेटमधील यश
राज्यस्तरीय आणि घरगुती क्रिकेटमध्ये सूर्यवंशीने उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रणजी ट्रॉफी आणि इतर स्पर्धांमध्ये त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या. त्याच्या आक्रमक शैलीमुळे आणि जलद गतीने धावा करण्याच्या क्षमतेमुळे तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला. मधल्या फळीत खेळताना सामन्यांचा कल बदलण्याची त्याची क्षमता विशेष ठरली.
आयपीएलमध्ये धमाकेदार एन्ट्री
घरगुती क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्याची निवड आयपीएलसाठी झाली. आयपीएल 2025 मध्ये सुर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1.10 करोडमध्ये आपल्या संघात सामील करुन घेतले. मोठ्या मंचावर पहिल्याच हंगामात खेळताना त्याने कोणताही दबाव न घेता निर्भीड फलंदाजी केली. अनुभवी गोलंदाजांसमोरही त्याने आत्मविश्वासाने जोरदार फटकेबाजी करत आपली उपस्थिती प्रभावीपणे जाणवून दिली.
रेकॉर्डब्रेक कामगिरी
यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यवंशीने दोन वेळा केवळ 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. ही कामगिरी त्याच्या स्फोटक फलंदाजीचे प्रतीक मानली जात आहे. कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची क्षमता ही त्याची सर्वात मोठी ताकद ठरली आहे. त्याच्या या खेळींमुळे संघाला कठीण परिस्थितीतही विजय मिळविण्यात मोलाची मदत झाली आहे.
सध्याचे आकडे आणि प्रभाव
आयपीएल 2026 मधील सामन्यांमध्ये सूर्यवंशीने उच्च स्ट्राईक रेटसह महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. चौकार-षटकारांची बरसात करत तो प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच्या फलंदाजीमुळे संघाची धावगती कायम ठेवण्यात मोठी मदत झाली आहे.
खेळाची शैली आणि वैशिष्ट्ये
सूर्यवंशीची फलंदाजी आक्रमक आणि आधुनिक क्रिकेटला साजेशी अशीच आहे. तो मैदानाच्या सर्व भागात फटके मारू शकतो. स्पिन आणि वेगवान गोलंदाजी दोन्ही विरुद्ध तो सहज खेळतो. दबावाच्या परिस्थितीत शांत राहून मोठे फटके मारण्याची त्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा व्ोगळे ठरवते.
भविष्यातील शक्यता
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, हा भारतीय क्रिकेटचा पुढील मोठा स्टार ठरू शकतो. त्याची सध्याची कामगिरी पाहता, लवकरच त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सातत्य राखल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप उमटवू शकतो इतकी त्याची आहे.

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment