संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

वन प्लसचा 9000 एम.ए.एच बॅटरी फोन सर्वांना आकर्षित करतोय,नवे फिचर्स लक्ष वेधून घेतोय

SHARE:

सध्याच्या ॲन्ड्रॉईड फोनच्या जमान्यात प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नव-नवीन फिचर्स सर्वांसमोर ठेवत लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करीत असते, अशीच एक वन प्लस या कंपनीने वन प्लस नॉर्ड-6 हा फोन लॉंच करीत तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे 9000 एम.ए.एच बॅटरी बॅकअप या फोनला देण्यात आला आहे. तसेच 27 वॅटस्‌‍चा रिव्हर्स चार्जिंग सपोर्टही याला देण्यात आला आहे.
हा फोन विविध तीन आकर्षक कलर्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यात फ्रेश मिंट, क्विक सिल्व्हर, पिच ब्लॅट असे कॅची कलरची रेंज इथे लॉंच करण्यात आली आहे.
मोबाईल गेमिंग करणाऱ्या तरुणांसाठी हा फोन नक्कीच प्रभावी ठरेल, यातील बॅटरी बॅकअप तसेच 165 हर्टस फ्रेम रेटस असणारा 6.7 इंच डिस्प्ले याने गेमिंग करणे अजूनच सोपे होणार आहे म्हणूनचं हा फोन सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment