तळेगांव ढमढेरे : ज्येष्ठ राजकीय नेते पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब जयवंत ढमढेरे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 76 वर्षांचे होत.
त्यांच्या मागे पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे, प्रतिक बाळासाहेब ढमढेरे, संकेत बाळासाहेब ढमढेरे अशी तीन मुले तसेच सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे
तळेगांव सारख्या एका ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या या नेत्याने एकेकाळी शिरुर तालुक्याच्या राजकारणात आपला मोठा दबदबा निर्माण केला होता, बड्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणूनही त्यांची त्या काळात वेगळी ओळख होती, त्यांच्यातील माणूसप्रधान व्यक्तीमत्वामुळेच त्यांच्याशी असंख्य नेते, कार्यकर्ते व स्थानिक नेते जोडले गेले होते. याचबरोबर त्यांनी राजकारणात मोठ यश मिळविले होते. 1980 पासून ते दूध संघाच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय झाले होते तर 1987 मध्ये त्यांना संचालक म्हणून संधी मिळाली होती, अनेक टर्म त्यांनी या पदावर काम पाहीले. घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक म्हणूनही त्यांनी आपली कारकिर्द भूषविली होती.








