संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

खोट्याला कधीचं खरेपणाची किंमत कळत नाही, खऱ्याला कधीचं खोट वागण्याची हिंमत होत नाही

SHARE:

आजच्या या युगात कसं वागावं खरचं कळतं नाही, आपण कितीही प्रामाणिक वागलं तरी काही माणसं जाणीवपूर्वक माणसांची किंमत ठेवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. एखाद्याला विनाकारण त्रास होत असताना आपल्याला वेदना होतात, पण त्रास देणाऱ्याला त्याचं काहीचं वाटतं नाही, कारण आजच्या या युगात काही माणसांच्या संवेदना आता बोथट होत चालल्या आहेत. प्रत्येक जण स्वत:ला मोठं समजू लागलाय, प्रत्येकाच्या वागण्यात बोलण्यात विलक्षण बदल दिसून येतोय. कुणाला पैशाची मस्ती, कुणाला सत्तेचा माज तर कुणाला आपलं कुणीचं काही वाकडं करु शकत नाही याची गुम त्यामुळे जो तो आपापल्या पध्दतीने इथे वागताना दिसून येतोय, म्हणूनचं खरेपणाची मात्र कोंडी होताना क्षणोक्षणी जाणवतेय. इथे प्रचंड स्पर्धा वाढलीय, बोलणाऱ्याला किंमत आहे, न बोलणाऱ्याला कुणीचं हिंमत देताना दिसत नाही, इथे जोतो आपापल्या कौशल्यावर आणि बुध्दीचातुर्यावर प्रगतीचे शिखर गाठतो आहे, ज्याच्यात धमक आहे, तो टीकतोय पण ज्याच्यात हिंमत नाही तो हरतोय, म्हणूनचं जीवनाच्या या विद्यापीठात अनुभवांची पदवी घेत , प्रामाणिकपणे कार्यरत राहील्यास अपयश कधीचं पदरात येत नाही, लोक काय म्हणतील याचा विचार केला तर आयुष्यात आपण कधीचं पुढे जावू शकत नाही, परंतु टीकाकारांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन आपण मार्गस्थ राहीलो तर नक्कीचं यश आपल्या जवळ आहे, प्रचंड जिद्द, तितकीच चिकाटी, खमक्या आत्मविश्वास आणि पुढे जाण्याचे धाडस आपल्यात असेल तर यशाच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला कुणीचं रोखू शकत नाही. असू द्या त्यांच्यात पैशाची गुम, करु द्या त्यांनी आपल्यावर रुबाब, आपल्याशी स्पर्धा करण्यासाठी त्याने कोणत्याही पातळीवर जावू द्या, त्याने आपल्या विरोधात कितीही कुरघोड्या करु द्यात, हत्ती चालतो आणि कुत्रा भुंकत राहतो, पण कुत्र्याच्या भुंकण्याने हत्ती कधीही थांबत नाही, तो चालत राहतो, आपणही आपल्या ध्येयाच्या वाटेवर सदैव चालत राहा, कोण काय म्हणेल याचा विचार अजिबात करु नका, त्याने समाजात कितीही खोटेपणाने यश मिळविण्याचा प्रयत्न करु द्या, खोटेपणा कधीचं टिकत नाही यावर विश्वास ठेवा, जो तो आपापल्या पध्दतीने पुढे जातो, आपण मात्र ठामपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहीलं पाहीजे, फक्त प्रामाणिक राहा, खोटेपणाला कधीचं जवळ करु नका, कारण खोट्याला कधीचं खरेपणाची किंमत कळत नाही, खऱ्या माणसाला कधीचं खोट वागण्याची हिंमत होत नाही, आपण खरे आहात म्हणूनचं यश आपल्या जवळ आहे, कष्टाला जिद्दीची, जिद्दीला चिकाटीची, चिकाटीला आत्मविश्वासाची आणि आत्मविश्वासाला कृतीची जोड मिळाली की यश फारसे दूर राहत नाही, एवढे मात्र निश्चित !

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment