वाढती स्पर्धा लक्षात घेता बाईक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या हिरो कंपनीने आता इतरांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी हिरो व्हिडा व्हिएक्स -2 ही बाईक लाँच केली आहे. यात रिम्युव्हेबल बॅटरी तसेच बॅटरी ॲज सर्व्हिस अशी सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे, याद्वारे कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना ही आकर्षक दिसणारी बाईक केवळ 45 ते 58 हजार रुपयांपर्यंतच खरेदी करता येणार असल्याने ही नवी बाईक सर्वांच्याचं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या बाईकमध्ये एकुण सात कलर उपलब्ध आहेत, यात पर्ल ब्लॅक, मेक्सस ब्लू, पर्ल रेड, मॅट व्हाईट, मॅट लाईम, मेटालिक ग्रे, ऑरेंज इत्यादी आकर्षक कलर उपलब्ध आहेत.
यातील बॅटरी ॲज सर्व्हिस या योजनेनुसार कंपनीने मोबाईल रिचार्ज प्रमाणे आपापल्या सोयीनुसार विविध प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत, यानुसार जितका गाडीचा वापर तितकेच पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत, हा प्लॅन दिवसावर अथवा महिन्यावर विकत घेता येतो अशी याची योजना आहे. या प्लॅनमुळेचं ही बाईक इतरांपेक्षा अतिशय कमी दरात उपलब्ध आहे. जर ग्राहकांना बॅटरी ॲज सर्व्हिस हा पर्याय नको असेल तर ग्राहक बॅटरी सहीत देखील ही बाईक खरेदी करु शकतात, बॅटरीसह या बाईकची किंमत 80 हजार ते 1 लाखांपर्यंत जाते अशी माहिती कंपनीने दिली आहे.
या बाईकमध्ये एलईडी टेल लॅम्प, एलईडी डिआरएल लाईट, एलईडी हेड लॅम्प, डिस्क ब्रेक सुविधा, मोबाईल ॲपद्वारे वापरता येण्याची सुविधा, हॅण्डलवरती एलईडी स्क्रीन व फास्ट चार्जिंग पोर्ट असे विविध फिचर्स दिले आहेत. ही बाईक कंपनीच्या माहितीनुसार एका चार्जिंगमध्ये 142 किलोमीटर धावते. मात्र ही बाईक 100 ते 120 ची रेंज देईल असे तज्ज्ञांचे मत आहे.








