अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष कार्यकर्ते, स्थानिक नेते आता या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना महायुती म्हणून नेमकी काय भूमिका घेणार ? शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकांमध्ये कसा प्रभाव टाकणार ? कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता, कोणाचे काम करणार, त्या त्या गणातून, गटातून वा प्रभागातून तिकीटाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, आपला नेता कुणाला महत्व देणार आणि कोण कुणाशी निष्ठा ठेवणार ? या सर्व राजकीय घडामोडींकडे लक्ष वेधून घेणाऱ्या निवडणुका येत्या चार ते पाच महिन्यातचं होणार असल्याने आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. वर वर फारशा राजकीय चालचाली जाणवत नसल्या तरी आता अंतर्गत छुप्या रणनितीला मात्र प्रचंड वेग आला आहे, त्यामुळे आगामी राजकीय घडामोडींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चित !
वास्तविक पाहता यापूवच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला असता राष्ट्रवादी एकसंध असताना शिरुर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर, खरेदी विक्री संघ, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि किंबहुना नगरपरिषद या सर्वच प्रमुख सत्ताकेंद्रावर माजी आमदार ॲड.अशोक पवार यांच्या गटाचे प्राबल्य राहीले होते, म्हणूनचं मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये वा निवडणुकांच्या रणांगणात माजी आमदार पवार यांनी नेहमीच बाजी मारल्याचे दिसून येते, पण सध्याची परिस्थिती प्रचंड बदलली आहे. त्यांच्या बाजूने असणारे सर्वच जिल्हा परिषद सदस्य आता पवार यांच्या विरोधात मोठे बंड करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील झाले आहेत. किंबहुना त्यांनीचं शिरुर-हवेलीतून ज्ञानेश्वर ऊ र्फ माऊलीआबा कटके यांना पाठींबा देत त्यांना विक्रमी मतांनी आमदारकीच्या खुचवर देखील विराजमान केले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील बरीच राजकीय समीकरणे निश्चितच बदलणार आहेत यात शंकाच नाही. एका बाजूला सर्वच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्या त्या भागातील सर्वच प्रभावी स्थानिक नेते, भाजपासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यांचे मोठे पाठबळ मिळवत आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या रणांगणात आमदार कटके पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषदेवर आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी प्रचंड तयारीनिशी उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे, किंबहुना तशी तयारी सुरु असल्याचेही बोलले जात आहे. आमदारकीची सत्ता हाती घेतल्या नंतरची ही त्यांची पहिलीच निवडणुक असल्याने त्यांच्या दृष्टीने व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दृष्टीनेही सर्वच निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणार असल्यानेच त्यांनी या निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठीची रणनिती आखल्याचीही माहिती आहे. सध्या गांवा-गांवातून आणि शिरुर शहरातून देखील निवडणुक लढण्यासाठी इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे, त्यामुळे साहजिकच त्या त्या भागातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊ न उमेदवार देताना आमदार कटके यांना मोठी कसरत करावी लागणार आहे, त्यात त्यांची ही पहिलीच निवडणुक असल्याने त्यांना छुप्या रणनितीबाबत प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपा, शिवसेना या पक्षांच्या विरोधात लढणार की त्यांना सोबत घेऊ न पुढे जाणार याबाबतची योग्य भूमिकाही त्यांना घ्यावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार पवार यांच्याकडील सर्वच खंदे समर्थक सध्या आमदार कटके यांच्या बाजूने असल्याने त्यांच्या गटातून कोण उमेदवार देणार, कोणते प्रभावी चेहरे समोर ठेवणार, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषदेचा गड आपल्या बाजूने कायम राखण्यासाठी कोणती रणनिती आखणार याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चिचत !
निवडणुकीची तारीख अजून निश्चित नसली तरी येत्या चार ते पाच महिन्यात कधीही निवडणुका होऊ शकतात याचा अंदाज घेऊ न आता सर्वच पक्ष आपापल्या परीने पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषदेवर आपली सत्ता काबीज करणाऱ्यासाठी छुपी रणनिती आखताना दिसून येतो आहे. सध्या वर वर कोणत्याच पक्षाच्या हालचाली दिसून येत नसल्या तरी कार्यकर्त्यांना मात्र नेत्यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याने त्या त्या भागातून जिंकण्यासाठी प्रचंड ताकद लावली जाणार असल्याचे चित्र गांवा-गांवातून किंवा शिरुर नगरपरिषदेच्या क्षेत्रातही अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष फुटीनंतरची ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक असल्याने ही प्रचंड प्रतिष्ठेची होणार आहे एवढे मात्र निश्चित!








