संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

ऑर्केस्टा क्षेत्रातील बादशहा इकबाल दरबारांच्या जाण्याने शिरुरकर हळहळले शिरुरचे भूषण म्हणून त्यांनी नेहमीच ह्दयात स्थान मिळवले !

SHARE:

शिरुरचे भूषण आणि प्रसिध्द मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील बादशहा अशी ओळख असलेले इकबाल दरबार यांचे नुकतेच आजारपणामुळे निधन झाल्याने संपूर्ण शिरुरवर शोककळा पसरली आहे. तर महाराष्ट्रातील रफी फॅन्स ग्रुपनेही या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
पुण्यातील प्रसिध्द दरबार ब्रॅण्डचे संस्थापक म्हणूनही दरबार यांची संपूर्ण देशाला ओळख आहे. मोहम्मद रफींचे चाहते अशीही त्यांची ओळख होती, याच प्रेमापोटी त्यांनी रफी फॅन्स ग्रुपची पुण्यात स्थापना केली होती. शिवाय ते उत्तम सॅक्सोफोन वादक म्हणूनही प्रसिध्द होते. आपल्या वयाच्या 75 व्या वष त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मागे तीन मुले, 1 मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. साप्ता.संवाद वाहिनीने 2004 साली शिरुरचे भूषण म्हणून त्यांचा संवाद गौरव पुरस्कार देऊ न गौरव केला होता.
भारतात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक वाद्य ऑर्केस्ट्रा क्षेत्रात आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या दरबार बॅण्डला दगडूशेठ हलवाई गणपती समोर मानाचे बॅण्डपथक म्हणून विशेष स्थान आहे.
दरबार यांचा जन्म 31 मार्च 1949 रोजी पुण्यात झाला होता. त्यांचे आजोबा रहिम व चुलते बाबुमिया यांनी 1905 मध्ये युनिव्हर्सल ब्रास बॅण्डची मुहूर्तमेढ रोवली या दोघांचेही मुळ गाव शिरुर आहे. पाच कंदिल चौक या ठिकाणी दरबार यांची जुनी जागा होती, मात्र गेल्या अनेक वर्षांपूव त्यांच्या पूर्वजांनी ही प्रॉपट विकून ते पुण्यात स्थायिक झाले होते. मात्र दरबार मुळ शिरुरचे असल्याने त्यांनी शिरुर शहरातून व तालुक्यातून असंख्य कार्यक्रम केले आहेत.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment