सख्या, आयुष्याच्या एका सुखद वळणावर आपली भेट झाली. अन्् माझं आयुष्यचं बदलून गेलं. तू मला जगायला शिकवलंस, तुझ्या सोबतीनं मला नवीन आयुष्य दिलं, जीवन काय असतं तुझ्यामुळे मला समजलं, आयुष्याचं या वाटेवर चालताना माणसानं कसं असावं हे तुझ्या सान्निध्यामुळं मला उमजलं, म्हणूनचं तू मला मनापासून आवडतोस, तुझ्यातील माणूसकी मला नेहमीच भावते, तुझ्यातील आपलेपणा सर्वांनाचं हवा हवासा वाटतो, म्हणूनचं तूही मला तितकाचं आवडतोय, किंबहुना माझं तुझ्यावर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेम आहे जे मी शब्दात नाही व्यक्त करु शकतं.
खरचं जग काय म्हणेल याचा विचार आजपर्यंत मी आयुष्यात कधीचं केला नाही, जात-पात धर्म आणि भेदाभेद मी कधीचं मानली नाही. समाजात जगताना वावरताना माणसांची एकमेकांना नेहमीच आधाराची गरज असते, त्यामुळे समाजातील माणूसकी हा एकमेव धर्म आहे असे मी मानते, प्रेमाचा अतिरेक असू नये, प्रेम बीभत्स असू नये, प्रेमात निर्मळता असावी, पारदर्शकता असावी, प्र्रेमात शारिरीक आकर्षण नसावं, प्रेमातलं सौर्द्य जाणता आलं पाहीजे, प्रेम समजून घेता आलं पाहीजे,प्रेम समजताना प्रेमाच्या विश्वात हरवताना वास्तवही स्विकारता आलं पाहीजे या मतांची मी आहे, त्यामुळे तुझ्या प्रेमात पडताना मला स्वत:चे आणि जगाचे भान आहे एवढेचं मी सांगेन. मी सरळ मनाची मुलगी आहे, मला माणसं कळतात, माणसांना मदत करणे मला आवडते, माणसात मिसळणं, माणसांना समजून घेणं मला छान वाटतं, म्हणूनचं मी काहीशी भावनिक आहे, काहीशी हट्टी आहे आणि तितकीचं जिद्दीही म्हणूनचं मी तुझ्या प्रेमात हरवताना एकमेव तूचं आहेस की जो मला समजून घेईल, माझ्या भावनांची कदर करील, माझ्या शब्दांना किंमत देईल आणि मला माझ्या स्वप्नांकडे झेपावण्यासाठी माझ्या पंखात पूरेसे बळ देईल, म्हणूनचं मी तुझ्या प्रचंड प्रेमात आहे.
तू खुप छान आहेस, गोड आहेस, तुझ्या शब्दात प्रचंड ताकद आहे, तुझ्या भावनांमध्ये प्रचंड आत्मीयता आहे, आपुलकी आहे म्हणूनचं तू मला मनापासून आवडतोस. खरं सांगते, आजही तुझ्या कुशीत सामावताना दु:ख हलकं होतं, तू समोर असताना, मन हरवून जातं, माझ्या या प्रेमाचा तू स्विकार करशील याची मला खात्री आहे, म्हणूनचं मी मनापासून तुझ्या होकाराच्या प्रतिक्षेत आहे !
मदन काळे : 9665992992








