संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवा, पुढाकार घेत गुन्हेगारी थांबवा, निमंत्रण देण्याच्या बहाण्याने घरात गेले, मंगळसूत्र नेले, चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ, जागृक राहणे क्रमप्राप्त झाले

SHARE:

दोन अनोळखी इसम आपल्या दुचाकीवरुन एका घरासमोर आले आणि आंम्ही आपणांस पूजेचे निमंत्रण द्यायला आलो आहे, आम्हाला पाणी द्या असे म्हणताना तळेगांव येथील तुषार ढमढेरे यांच्या आत्त्या सुरेखा साळुंखे या पाणी आणण्यासाठी वळतानाचं त्यातील एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावले आणि दोघेही तिथून दुचाकीवरुन पसार झाले आहेत.
या घटनेची फिर्याद तुषार जनार्दन ढमढेरे (वय 34,रा.काटे आळी,तळेगांव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार अमोल चव्हाण करीत आहेत.
घरांजवळ रेकी करणे, बॅंकांजवळ रेकी करणे, घरात चोरी करणे किंवा गदचा गैरफायदा उठवत दुचाकी चोरणे, रस्त्यांवरुन चालताना एखादी महिला बेसावध असताना मंगळसूत्र हिसकावणे अशा चोऱ्यांमध्ये सध्या मोठी वाढ होते आहे, त्यामुळे आपण बॅंकेत असा, घरी असा अथवा सार्वजनिक ठिकाणी जिथे आपणास काहीही संशयास्पद वाटल्यास तातडीने संबंधीत पोलिस स्टेशनला कळवावे, किंमान आपण पुढे घडणारा गुन्हा यामुळे नक्कीचं थांबवू शकतो, म्हणूनचं पोलिसांना सहकार्य करा, संशयास्पद वाटल्यास तातडीने कळवा !

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment