संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

शिरुर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर!

SHARE:

शिरुर तालुक्यातील एकुण 96 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवार दि.23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे, प्रांताधिकारी पूनम आहिरे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली आहे.
यावेळी तालुक्यातील सरपंच, विविध पक्षाचे कार्यकर्ते असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी 29, सर्वसाधारणसाठी 30, ओबीसी सर्वसाधारण 13, ओबीसी महिला 13, अनुसुचित जाती सर्वसाधारण 4 व महिला 4, अनुसुचित जमाती सर्वधारण 1 व अनुसूचित जमाती महिला 2 असे विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
मुखई, गोलेगांव, वढू बु., जांबूत या ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.
वडगांव रासाई, माळवाडी अनुसूचित जमाती महिलांकरीता राखीव झाले आहे.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) – निमगांव भोगी, रावडेवाडी, निमोणे, नागरगांव, पिंपळसुटी, पिंपळे जगताप, पिंपरी दुमाला, सादलगांव, म्हसे बु., शरदवाडी, वाडा पुनर्वसन, चव्हाणवाडी, करडे
नागरीकांचा मागास प्रवर्ग – आंधळगांव, अण्णापूर,कारेगांव, कोळगांव डोळस,मिडगुलवाडी,गणेगांव खालसा, वाघाळे, पारोडी,खंडाळे, फाकटे, कवठे येमाई, कान्हूरमेसाई, कासारी
सर्वधारण महिला- तर्डोबाची वाडी, न्हावरे, आंबळे, कळवंतवाडी, धानोरे, टाकळीभीमा, आपटी, केंदूर, कोरेगांव भीमा, चिंचोली मोराची, शिंदोडी, उरळगांव, गणेगांव दुमाला, पाबळ, भांबर्डे, बुरुंजवाडी, खैरेनगर, विठ्ठलवाडी, आलेगांव पागा, शिक्रापूर, मोटेवाडी, डिंग्रजवाडी, कोंढापूरी, पिंपरखेड, वरुडे, निमगांव दुडे, निव, बाभुळसर बु., दरेकरवाडी, गुनाट
सर्वसाधारण – शिरुर ग्रामीण,टाकळीहाजी, रांजणगांव गणपती, मलठण,सणसवाडी, इनामगांव, ढोकसांगवी, चिंचणी, काठापूरखुर्द, वडनेरखुर्द, शिरसगांव काटा, चांडोह, करंदी, रांजणगांव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी, मांडवगण फराटा, तळेगांव ढमढेरे, सोनेसांगवी, दहीवडी, बाभुळसर खुर्द,सविंदणे, सरदवाडी, जातेगांव बु., धामारी, जातेगांव खुर्द, खैरेवाडी, करंजावणे, पिंपळे खालसा या ग्रामपंचायती सर्वधारण प्रवर्ग गटासाठी राखीव झाल्या आहेत. गांवा-गांवातून जाहीर झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षणामुळे आता राजकीय तयारीला वेग आला आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment