हाय फ्रेंडस, कसे आहात मजेत ना ? पण आज मी तुंम्हाला अजिबात बोर-बिर करण्याच्या मुडमध्ये नाहीये बरं का, मुद्याचं बोलणार आणि मुद्यालाच हात घालणार. मित्रांनो, मान्य आहे कॉलेज लाईफ म्हणजे फुल टू एन्जॉय, त्यामुळे साहजिकच सबकुछ सपनो में दिखता है, म्हणून फक्त स्वप्नांमध्ये हरवत बसू नका, कधीतरी काहीच हरकत नाही यार, कॉलेज लाईफ है, फिर एन्जॉय तो बनता है ना ? नक्कीच आहे, शेवटी हे वयच तसं असतं, या वयात आयुष्याचा आनंद नाही घ्यायचा तर मग कधी घ्यायचा, नक्कीच घ्या, काहीचं हरकत नाही, यार आम्ही पण तुमच्यासारखचं जगलोय, आम्ही पण फुल टू एन्जॉय केलाय, पण खरं सांगू निम्म आयुष्य गेल्यावर कळतं, आपल्या जीवनातील मौल्यवान दिवस आपण फुकट घालवले, आर्ध आयुष्य फक्त जीवनाचा आनंद लुटला, पण धाडस दाखविण्याची वेळ आल्यावर मात्र जीव नाही रेटला अशीही अवस्था झाली, म्हणूनच कॉलेज लाईफ बरोबरच आयुष्यही तितकचं बारकाईने समजून घ्या, इथे फक्त स्वप्नांना नाही तर कृतीला अधिक महत्व आहे, म्हणूनचं मोठे ध्येय समोर ठेवूनच वाटचाल करा, मी ग्रामीण भागातला आहे, मला जमेल की नाही, मी त्यांच्यासमोर कसं काय व्यक्त होऊ , मनातलं बोलण्याची इच्छा आहे पण हिम्मत होत नाही, अशा कितीतरी गोष्टींमुळे आपण आपल्या मनातील आत्मविश्वास पूर्णपणे हरवून बसतो, म्हणूनच मित्रांनो, हा न्यूनगंड दूर करा, एकदम दिल खोल के बोलता हू, जीवनाचा आनंद नक्कीच घ्या, पण जीवनही समजून घ्या, जगाच्या या बाजारात स्वत:ला सिध्द करायचं असेल तर आत्मविश्वासाने उभे राहा, आलेल्या संकटांना तितक्याच धाडसाने सामोरे जा, आलेल्या परिस्थितीशी तितक्याच जिद्दीने सामना करण्याची तयारी ठेवा, आयुष्याचा हा प्रवास खुप खडतर आहे, पण जीवनाची वाट सुखकर करण्यासाठी नेहमीच स्वत:त प्रचंड आत्मविश्वास निर्माण करा, जग खुप मोठं आहे, या जगात स्वत:ला सिध्द करायचे असेल तर, करोडोंच्या या गदत आपली ओळख निर्माण करा, तिच्यासाठी नक्की जगा, पण तिच्या नजरेत मोठे होण्यासाठी कधीच स्वत:तला आत्मविश्वास ढासळू देऊ नका, जे काम हाती घ्याल तिथे प्रामाणिकपणा जोपासा, दुनियेला झुकविण्याची ताकद स्वत:त निर्माण करा, विरोधकांसमोर कधीही हार मानू नका, चुक असेल तर स्वारी म्हणा, पण चुकीचे काम आयुष्यात कधीही करु नका, मग बघा जीवनाच्या या विद्यापीठात यशाची पदवी घेताना आपल्या समोर कितीही वादळे आली तरी आपण त्यावर सहजपणे स्वार व्हाल, कारण जगाला आपल्या मुठीत घेण्याची ताकद त्यावेळी आपल्यात निर्माण झालेली असेल,जग आपल्याला सलाम करेल आणि आपण जगावर राज्य कराल.
लेखक – मदन काळे








