काही वर्षांपासून मोटोचे फोन आपल्या आकर्षक लुक व नाविण्यपूर्ण फिचर्समुळे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. नुकत्याचं लॉंच झालेल्या मोटोच्या एज्-60 स्टायलसनेही तरुणांना प्रचंड भुरळ घातल्याचे अनुभवायला मिळत आहे. 20 ते 22 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असलेल्या या फोनमध्ये 120 एच.झेड. डिस्प्ले, 5000 एम.ए.एच. बॅटरी, 64 डब्लू वायर्ड चार्जिंग सपोर्ट तर 15 डब्लू वायरलेस चार्जिंग सपोर्ट, हायब्रीड सिमकार्ड स्लॉट व ई-सीम सपोर्टही आहे.
हा फोन 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 50 एमपीचा मुख्य सेंसर कॅमेरा, 13 एमपीचा मॅक्रो तर 3 एमपी लाईट सेंसर कॅमेरा आहे तर याचा फ्रंट कॅमेरा 32 एमपी सेंसरचा आहे.
या फोनच्या कॅमेऱ्याला फोर-के सपोर्ट असल्याने आजच्या डिजिटल युगात तरुणाईला या फिचर्सने अक्षरश: वेड लावले आहे. या फोनचे विशेष फिचर्स म्हणजे या फोनसोबत आलेल्या पेन टूलद्वारे स्केच टू इमेज फिचर्स, हॅण्डरायटींग कॅल्क्युलेटर, ओसीआर फिचर्स इत्यादी नाविन्यपूर्ण फिचर्स यात उपलब्ध आहेत, जे इतर या रेंजमधील फोनमध्ये अनुभवायला मिळत नाहीत, म्हणूनचं हा फोन सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
हा फोन ॲन्ड्राईड-15 ऑपरेटींग सिस्टम सोबत येतो, तर या फोनला दोन वर्षांची मेजर अपडेट व तीन वर्षांचे सिक्युरीटी अपडेट कंपनीद्वारे दिले आहे.








