एकेकाळी शिरुर,श्रीगोंदा व पारनेर तालुक्याची मुख्य बाजारपेठ म्हणून शिरुरची ओळख होती. आजही या तिन्हीही तालुक्यातील जनतेने शिरुरशी नेहमीचं आपुलकीचे व आपलेपणाचे नाते जपत या तालुक्याचे अस्तित्व अबाधीत ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच वाढत्या औद्यागिकरणामुळे शिरुर तालुका व परिसर जरी विस्तारत असला तरीही एक माणूसकीप्रधान शहर व तालुका म्हणून शिरुरने आपली एक वेगळी ओळख आजपर्यंत कायम ठेवली आहे.
कारेगांव औद्योगिक परिसर तसेच आता नव्याने विकसीत होत असलेला कारेगांव औद्योगिक वसाहतीचाचं दुसरा टप्पा करडे औद्योगिक क्षेत्रही आता नव्याने विस्तारीत होत आहे. कोरेगांव भीमा, सणसवाडी, कोंढापूरी या परिसरातूनही आता औद्योगिक क्षेत्राचा मोठा विस्तार होताना दिसून येत आहे, तर दुसऱ्या बाजूला शिरुरपासून पुढे अहिल्यानगरकडे जाताना फक्त 20 किलोमीटर अंतरावर असणारे सुपा औद्योगिक क्षेत्र, तेही आता शिरुरच्या दिशेने विस्तारत चालले आहे. एकुणच संपूर्ण पुणे-अहिल्यानगर हायवे थेट संभाजीनगर पर्यंत आता औद्योगिक क्षेत्राने परिपूर्ण होत आहे. म्हणूनचं एक मध्यवत केंद्र म्हणून शिरुरचे महत्व दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. याच अनुषंगाने आता मुंबई, पुणे, राजस्थान, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध भागातील असंख्य लोक आता शिरुरमध्ये आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने स्थायीक होताना दिसत आहेत. पण शिरुरकरांनीही आजपर्यंत कधीचं कुणाला नाकारले नाही. प्रत्येकाला आपल्यात सामावून घेत सर्वांना नेहमीचं मदतीचा हात दिला आहे. म्हणूनचं शिरुरची बाजारपेठ उलट बाहेरील लोकांच्या गर्दीमुळे अधिक फुलत गेली, विस्तारत गेली आणि इथल्या जागांनाही सोन्याचा भाव आला.आज पुण्यातल्या कोरेगांव पार्कच्या जागेचा दर शिरुरच्या बाजारपेठेतील जागा घेवून जाते तर काही ठिकाणी पुणे व मुंबईपेक्षाही अधिक दर शिरुरला अनुभवायला मिळतात. याचं मुळ कारण शिरुर एक मध्यवत शहर आहे, जिथून 24 तास वाहन व्यवस्था उपलब्ध आहे. पुणे-नगर रस्त्यावरचं गाव असल्यानं 24 तास वाहतुक सुरु असते. त्यात महाराष्ट्रातील अत्यंत सुरक्षित शहर म्हणूनही शिरुरने आजपर्यंत आपली एक वेगळी ओळख जपली आहे. म्हणूनचं शिरुरच्या मातीला आपुलकीचा व मायेचा गंध आहे, यामुळेचं विविध भागातील कुटुंब आता कायमस्वरुपी शिरुरला स्थलांतरीत होताना दिसत आहेत. म्हणूनच शिरुरला विस्तारीत बाजारपेठेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. एकुणचं काय तर बाहेरील लोकही आता सुरक्षिततेसाठी शिरुरमध्ये राहणे पसंत करतात. त्यामुळे इथे जागांचे दर पुणे-मुंबईपेक्षाही अधिक असल्याचे अनुभवायला मिळते.अगदी मोक्याच्या कमी झालेल्या जागा, वाढत्या औद्योगिकरणामुळे कंपनी कामगार अधिकारी, सध्या मोठ्या शहरातील असुरक्षितेमुळे निवृत्त लोकांनाही गावची ओढ निर्माण होताना दिसून येत आहे. एकुणच काय तर पूव हायवेवरचं एक छोटसं ग्रामीण गाव असणारं शिरुर आता भव्य शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बाबुराव नगर, गंगानगर यासारखी उपनगरही आता विस्तारल्याने शहराची व्याप्ती प्रचंड वाढते आहे. एवढे असूनही शिरुर तालुका राहण्यासाठी खिशाला परवडणारा तालुका म्हणून ओळखला जातो. इथे खिशाला शहरासारखी फारशी झळ पडत नाही. बाहेरच्या लोकांनाही इथं राहणं परवडतं. म्हणूनही अनेकजण शिरुरमध्ये राहण्याला पसंती देतात. त्यातच सर्व महत्वाच्या शिक्षणसंस्था इथे आहेत, चांगलं कॉलेज आहे, शिस्त आहे, सुरक्षितता आहे, शिरुरची हीच ओळख कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनीचं प्रयत्न केले पाहीजेत, कारण आपण शिरुरकर आहोत याचा सर्वांना
नक्कीचं अभिमान आहे.








