सख्या, खरचं तुझ्याबद्दल काय लिहावं, मी नि:शब्द आहे. माणसानं कसं असावं, माणसाने कसं वागावं. प्रत्येका बद्दल तुझ्या मनात असणारी आपलेपणाची व आपुलकीची भावना. तुझ्यातील सामाजिक जाणीव, इतरांना मदत करण्याची असणारी प्रामाणिक वृत्ती आणि समाजाने ज्याच्याकडून खरचं काहीतरी घ्यावं असा तू आहेस, म्हणूनचं मी तुझ्या प्रेमात अगदी आकांत बुडालीय, मला ठावुक नाही तुझ्या मनात माझ्या बद्दल काय भावना आहेत, मात्र तुझे स्थान माझ्या ह्द्यात आहे, म्हणूनचं म्हणते माझं तुझ्यावर मनापासून खुप खुप प्रेम आहे. तुझ्याशिवाय जगण्याची आता मी कल्पनाच कधी करु शकत नाही, म्हणूनचं हा पत्रप्रपंच !
आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर आपण एकमेकांना मित्र म्हणून भेटलो, मी कधीचं तुझ्या दिसण्याचा विचार केला नाही, परंतु तुझ्या जवळ असण्याचा मोह मला कधीचं आवरता आला नाही, तू खुप छान बोलतोस, खुप छान वागतोस, अगदी मनात निर्मळ भावना ठेवून सर्वांना निस्वाथपणे मदत करतोस, पण इतरांकडून कधीही मदतीची अपेक्षा आजपर्यंत ठेवली नाहीस, कधीही कुणाचा तिरस्कार केला नाहीस, माझी स्पर्धा माझ्याशीच आहे, त्यामुळे मी माझ्यात बदल करुन पुढे जायचा निर्णय घेतला असल्याने जे काही माझं चागलं वाईट होणार आहे, मी त्याला स्वत: जबाबदार आहे, त्यामुळे मी आयुष्यात कधीचं कुणाला दोष देणार नाही हा तुझ्यातील विचार नुसता समोर ठेवला तरी एक माणूस म्हणून तू ग्रेट आहेस याचा मी वेळोवेळी अनुभव घेतला आहे. इतरांच्या डोळ्यात उभं राहणारं पाणी तुला अस्वस्थ करतं, परंतु एकटेपणाने तुझ्या डोळ्यात येणारे अश्रू पुसण्यासाठी कुणीतरी आलं पाहीजे ही अपेक्षा तू कधीचं केली नाहीस, समाजाला नेहमीच मोकळेपणाने भरभरुन देत राहीलास पण कधीचं फळाची अपेक्षा केली नाही, म्हणूनचं मला तुझा नेहमीच हेवा वाटतो. खरं तर तुला तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी सखी हवीय तशी मी आहे की नाही खरचं मला ठावुक नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला नक्कीच आनंद देवू शकते, तुझ्या सुख, दु:खात खंबीरपणे पाठीशी उभी राहून तुझी सखी म्हणून मी माझे कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडू शकते याची मला खात्री आहे, म्हणूनच सख्या तू फक्त माझा आणि माझा असावंस असं मला नेहमीचं वाटतं, तुझ्या मनात खरचं काय आहे मला ठावुक नाही, परंतु माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे.
आपण एकमेकांना नेहमीच भेटतो, आपले विचारही प्रचंड जुळतात,पण आपण कधीचं त्या भावनेने व्यक्त झालो नाही, पण आजही तू नजरेआड झालास की माझी अस्वस्थता वाढते, सतत तुझा सहवास हवा हवासा वाटतो, तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस, म्हणूनचं तू माझा प्राण आहेस, प्लीज मला होकार देशील ना ? पण प्लीज प्लीज प्लीज माझ्याशी कधीही मैत्री तोडू नकोस, कारण तुझ्याशिवाय माझं जीवन शुन्य आहे, माझं तुझ्यावर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेम आहे कारण सख्या, तुझा सहवास लाभताना छान जगाता येतं, तुझ्या कुशीत सामावताना दु:ख हलकं होतं !
प्रतिक्रिया जरुर कळवा, संपर्क – मदन काळे – 9665992992








