संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गामुळे पुणे-अहिल्यानगर प्रवास दिड तासात शक्य होणार 116 कि.मी.च्या या मार्गावर एकुण 12 रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार

SHARE:

दिवसेंदिवस पुणे ते अहिल्यानगर रस्त्यावर सततची होणारी वाहतुककोंडी लक्षात घेऊ न महामार्गाला समांतर असा दुहेरी रेल्वे मार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, नुकतेच या संदर्भातील भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल (डीपीआर) कोकण रेल्वे कॉपोर्रेशन लि. कंपनीने सादर केला आहे. हा महामार्ग एकुण 116 किलोमीटरचा असणार आहे तर या रेल्वे मार्गावर एकुण 12 स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत अशी माहिती आहे, सध्या पुणे-अहिल्यानगर प्रवासासाठी कार किंवा बसने साधारणपणे तीन ते साडेतीन तास लागतात, मात्र या नव्या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे हा मोठा प्रवास केवळ दिड तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे, यामुळे साहजिकच या पुणे – अहिल्यानगर दरम्यान असणाऱ्या गावांच्या विकासासाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.
या रेल्वे मार्गासाठी हवेली, शिरुर,पारनेर,आणि अहिल्या नगर या चार तालुक्यातील जमीनींचे भूसंपादन होणार आहे, यासाठी सर्वाधिक भूसंपादन शिरुर तालुक्यातून होणार आहे असे समजते.
या रेल्वे मार्गावर लोणीकाळभोर, कोलवडी, वाघोली, वढु बु.,जातेगांव, रांजणगांव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगांव, चास आणि अहिल्यानगर अशी एकुण 12 मुख्य रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत अशीही माहिती आहे, सध्या या प्रवासाचे एकुण अंतर 154 कि.मी. आहे, पण या रेल्वे मार्गामुळे ते 38 कि.मी ने कमी होणार आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment