वास्तविक पाहता आजची गोष्ट जेवढी भावनिक तेवढीच ह्द्य हेलावून टाकणारी आहे..एकदा एक बाई अचानक माझ्याकडे आली, चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन आणि तितकचं दु:ख, पायाला इसबगोल झालेला आणि काही केल्या कमी होत नव्हता. कुणीतरी तिला माझं नाव उपचारासाठी सुचवलं होतं, म्हणून ती आली होती, मात्र तिला पाहताक्षणी मला जाणवले की, तिला कशाचे तरी प्रचंड टेंशन आहे. खोलवर विचारल्यावर ती बोलती झाली..आणि माझ्या पायाखालची वाळूचं सरकली..तिने जे सांगितलं तेे भयान वास्तव होतं..
सहा महिन्यांपूव तिच्या 8 वर्षांच्या मुलाला अचानक दवाखान्यात दाखल करण्यात आलं तेंव्हा त्याची परीस्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला अक्षरश: बेडला बाधूंन ठेवलं होतं. तो सारखा ओरडत होता, पाणी..पाणी..पाणी..पण त्याला पाणी गिळताही येत नव्हते, इतकी भयानक स्थिती होती त्याची..आई,वडील आणि भाऊ रुमच्या बाहेरुन डोकावून काचेतून आत बघत होते, मायेनं कुणालाही त्याच्या जवळ जाता येत नव्हतं, काही वेळातचं तो मुलगा अचानक शांत झाला..शेवटी समजलं त्या 8 वर्षांच्या चिरमुड्याचा रेबीजनं मृत्यू झाला आहे…प्रचंड धक्कादायक ही वास्तवता ऐकल्यानंतर माझंही मन भरुन आलं. अनेकांना रेबीजच्या या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत, म्हणूनचं याबाबात समाजातूनही जागृकता निर्माण होणे गरजेचे आहे, म्हणूनचं संवाद वाहिनीच्या माध्यमातून आज मी आपणाशी संवाद साधते आहे,
आजची जगाची वास्तवता डोळ्यासमोर ठेवली असता बहुतांश देशांनी याबाबत जागृक होवून रेबीज मुक्त देश म्हणून आपली प्रतिमा नक्कीचं उंचावली आहे. पण लाजीरवाणी बाब म्हणजे आपल्या देशात दरवष 32 हजार पेक्षा अधिक मृत्यू रेबीजने होतात हे अगदी खेदाने म्हणावसं वाटतं, म्हणूनचं याबाबत आता समाजानेच पुढाकार घेऊ न रेबीजमुक्त गांव म्हणून आपली ओळख निर्माण करायाला हवी. यासाठी आम्ही आपल्याला साथ देवू,
आजची वास्तवता समोर ठेवली असता अनेक भागात श्वानांची नसबंदीचं झालेली नसल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. लॉक डाऊ न पूव लोक उरलेले अन्न बाहेर टाकून द्यायचे, आता गांवा-गांवात घंटा गाड्यांची संकल्पना सुरु झाल्याने अन्न बाहेर टाकले जात नाही, हॉटेलचे उरलेले अन्नही नष्ट केले जाते, त्यामुळे भटक्या प्राण्यांचा अन्न मिळविण्याचा स्त्रोतच आता प्रचंड कमी झाला आहे, त्यामुळे कुणी खायला दिले तरचं त्यांची भुक भागते अशी अवस्था आहे, यातूनचं मग कचऱ्यामध्ये जे दिसेल ते खाल्ल्यामुळे श्वानांना विविध आजार होत आहेत, नसबंदी नसल्यामुळे सतत होणारी पिल्ले, ती रस्त्त्यावर भरकटत असल्याने अपघातांमध्ये सतत त्यांचा होणारा मृत्यू, लोक श्वानांच्या पिल्लांना कंटाळून इतर ठिकाणी सोडून देतात यामुळे त्यांच्या मनात निर्माण होणारी विरहाची भावना या गोष्टींचा मोठा आघातही प्राण्यांवर होत असतो, त्यांनाही भावना असतात, त्यांनाही मन असतं, फक्त श्वान आपल्या भावना व्यक्त करु शकत नाही, भुक लागली तर ते जोरजोरात भुंकतात, किंवा जास्तीत जास्त कुणाकडून काही मिळेल का या आशेनं सतत विविध भागात घिरट्या घालत असतात, पण काहीचं न मिळाल्याने त्यांची भुक अनावर होवून ते पिसाळल्यासारखे अंगावर येतात. आपल्या पिलाच्या विरहाने अनेकदा हिंस्त्र बनतात आणि मग ते इतरांवर हल्ला करतात. हीच यामागची भावना आहे, म्हणूनच वाचकांनो आपणांस हात जोडून विनंती आहे, प्राण्यांवर प्रेम करा, त्यांनाही भुक आहे, आपल्यातील थोड अन्न त्यांनाही द्या, त्यांना पाणी द्या, आपल्या भागातील ग्रामपंचायत अथवा नगरपरिषदेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून, आग्रह धरुन आपल्या भागातील श्वानांचे रेबीज लसीकरण करुन घ्या, मग पहा प्राणीही आपल्यावर नक्कीचं प्रेम करु लागतील. मान्य आहे, आपल्यावर हल्ला केल्यानंतर आपली भावना काय होते मी समजू शकते, पण त्यांच्यावर प्रेम केल्यानंतर आपणास कसा प्रतिसाद मिळतो मला नक्की कळवा, मीही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. आपल्या भागातही पिसाळलेली भटके श्वान असतील तर मला फोन करा, जिथे शक्य असेल तिथे मी स्वत: येऊ न आपणास योग्य मार्गदर्शन करील, पण प्लीज प्लीज प्लीज श्वानांना मारु नका, त्यांना भावना असतात, त्यांनाही मन असतं, त्यांनाही दु:ख होतं हे विसरु नका
नांदणी (ता.शिरोळ) येथील मठातील लाडकी हत्तीण महादेवीला गुजरातमधील वनतारा मध्ये पाठवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आणि आख्ख कोल्हापूर महादेवीच्या अधिकारासाठी रस्स्त्यावर उतरलं, पण ज्यावेळी महादेवीला वनतारात नेण्यात आले त्यावेळी हजारो कोल्हापूरकरांना निरोप देताना महादेवीच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. तीला भावना व्यक्त करता येत नव्हत्या परंतु तीच्या डोळ्यातले अश्रू खुप काही सांगून जात होते, आपण प्राण्यांवर सहजपणे अन्याय करतो, त्यांच्याविषयी राग व्यक्त करतो पण त्यांनाही माणसांसारख्या भावना असतात हे आपण विसरतो, श्वान हा असाच एक प्र्राणी आहे, ज्याला मानवी जीवनात खुप महत्वाचं स्थान आहे. तो आपल्या मालकाशी इमानदार असतो असेही म्हणतात, पोलिस खात्यात मुख्य तपासांसाठी स्पेशल डॉक स्कॉडचा वापर केला जातो, परंतु समाजात वावरताना मात्र आपण श्वानांच्या भावनांकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतो, श्वानाने चावा घेतल्यानंतर अनेकदा माणसाला रेबीज हा आजार होतो, याच आजाराचा मुद्दा घेऊ न प्रत्येक गांव रेबीजमुक्त करण्यासाठी शिक्रापूर येथील डॉ.ज्योती खडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे, त्या त्या भागातील नागरीकांनी ग्रामपंचायतींना निवेदन द्या आणि आपल्या परिसरातील श्वानांची नसबंदी करुन घ्या तसेच श्वानांना रेबीज लसीकरण करुन घ्या असेही आवाहन डॉ.खडे यांनी केले आहे. यासाठी त्यांनी शिरुर, शिक्रापूर, तळेगांव ढमढेरे, सणसवाडी या ठिकाणी रेबीज मुक्त गांव ही मोहिम अधिक तीव्र केली आहे. मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी हाती घेतलेली ही विशेष मोहिम आणि त्यांच्या प्राणीप्रेमाची दखल घेऊ न त्यांना नुकताच स्पंदन भुषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्याच शब्दात व्यक्त केलेल्या या भावना..
मदतीसाठी संपर्क :
डॉ.ज्योती खडे, मोबा : 9011332658,
डॉ.खडे स्कीन ॲण्ड लेझर क्लिनिक, दुसरा मजला, पुंडे पाटील कॉम्प्लेक्स, पाबळ चौक, शिक्रापूर, ता.शिरुर








