संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

नवीन टाटा हॅरीयर सर्वांना भुरळ घालतेय आकर्षक फिचर्स व लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे खडतर रस्त्यांवर धावणारी ईव्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतेय !

SHARE:

टाटा नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण व आकर्षक फिचर्सने परिपूर्ण असलेल्या वाहनांसाठी लोकप्रिय आहे. टाटा ग्रुपने अशीच एक नवी कोरी ईव्ही कार टाटा हॅरीयर ईव्ही 4 x 4 लॉंच करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जिंगमध्ये 622 कि.मी.ची रेंज ही कार देऊ शकते, तर तज्ज्ञांच्या मतानुसार ही कार 480 ते 500 कि.मी.रेंज सहजपणे देते.
ही गाडी डोंगर-दऱ्यांमध्ये सहज चालते. या कारमध्ये पॅनारॉमिक सनरुफ, सॅमसंग कंपनीने खास डेव्हलप केलेली 14.5 इंचाची एच.डी.स्क्रीन, जेबीएल ब्लॅक स्पिकर सिस्टम, फक्त 0.3 सेकंदात ही ईव्ही कार 0 ते 100 चे स्पीड घेते इतकी प्रचंड क्षमता या कारमध्ये अनुभवायला मिळते.
या कारमध्ये सहा मोडस्‌‍ आहेत. यात नॉर्मल मोड, कस्टम मोड, रॉक क्राऊ ल मोड, सॅण्ड मोड, मडरस्ट (चिखल) साठीचा विशिष्ट मोड व स्नो मोड अशा सहा मोडस्‌‍चा समावेश आहे. तसेच या कारमध्ये लेव्हल-2 ॲडासचे बावीस फिचर्स देखील सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत. तसेच ही ईव्ही कार असून देखील या कारची डिक्की प्रशस्त अशीच आहे. या कारमध्ये आणखी ऑफरोडींगसाठी जाणारे अथवा खडतर वाटेवर प्रवास करताना क्रुझ कंट्रोलचेही फिचर्स या कारला देण्यात आले आहे. असंख्य फिचर्स असूनही ही कार लांबच्या प्रवासासाठी कुटुंबातील सर्वांनाच आवडणारी अशी आहे म्हणूनचं या कारला सध्या प्रचंड मागणी आहे.
टाटा ग्रुपने पहिल्यांदा ईव्ही कार खरेदी करणाऱ्यांना बॅटरीवर लाईफ टाईम वॉरंटीचा बोनस दिला आहे. त्यामुळेही या कारकडे असंख्य वाहनप्रेमी आकर्षित होत आहेत. या कारचे ॲडव्हान्स बुकींग जुलै महिन्यापासून सुरु झाले आहे. या कारची संभाव्य किंमत 21 ते 30 लाखांच्या दरम्यान असू शकते असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या ईव्ही सेगमेंटमध्ये या रेंजच्या गाड्यांमधील 4 x 4 असणारी ही पहिलीच कार टाटा ग्रुपने लॉंच करुन वाहन प्रेमींना आकर्षित केले आहे. 120 वॅॅटस्‌‍च्या चार्जरने फक्त 25 मिनीटात ही गाडी चार्ज होते हे या गाडीचे वैशिष्ट्य आहे. फ्रंट व बॅकला सहा सहा पार्कींग सेन्सर, डॅश कॅमेरा,360 डिग्री कॅमेरा व सात एअर बॅग, 35 डिग्रीचा चढ अतिशय सुलभपणे ही गाडी चढू शकते, व भारतातील खड्डे असणाऱ्या रस्त्यांवर देखील ही गाडी सर्वोत्तम चालते. यामुळे ही गाडी कुटुंबासाठी सुरक्षित मानली जाते. या गाडीचे विशेष म्हणजे चावीद्वारे, फोनद्वारे अथवा डिजीटल कार्डद्वारे ही गाडी आपण पार्क करणे,पुढे मागे अथवा पूर्णपणे कंट्रोल करु शकतो असेही फिचर्स वाहनप्रेमींना भुरळ घालताना दिसून येत आहेत.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment