संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

योग्य मार्ग निवडा,कधीच पश्चाताप होणार नाही ध्येय समोर ठेवा,गाडी कधीच अडणार नाही ठेवा जिद्द,संधी कधीच हुकणार नाही!

SHARE:

पूव माहितीची साधने उपलब्ध नव्हती, त्यामुळे साहजिकच पालकचं आपल्या मुलांच्या करीअरसाठी त्याच्या शिक्षणाची दिशा ठरवायचे, पण आताचा जमाना बदललाय, विद्यार्थ्यांना काय वाटतं, याचा कलही आता पालक तितक्याचं आपुलकीने जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात, त्यामुळे मुला-मुलीची आवड लक्षात घेऊ न ज्याला ज्यात करीअर करायचे आहे, त्याला ती संधी देण्यासाठी आता शिक्षणाचा मार्ग नक्कीचं मोकळा झाला आहे, त्यामुळे थोडा धोकाही वाढला आहे, दहावी-बारावी नंतरचं वय थोडं अल्लढ असतं, त्यामुळे कोणत्या क्षेत्रात आपल्याला मोठी संधी आहे, याचे आकलन कदाचित दहावी-बारावीनंतर सहज होणं विद्यार्थ्यांना कठीण जातं, त्यामुळे योग्य वेळेत योग्य निर्णय घेणं या काळात महत्वाचं ठरतं. यावेळी जर मार्ग चुकला तर त्याचा पश्चाताप आयुष्यभर त्या मुलाला किंवा मुलीला भोगावा लागतो, म्हणूनचं ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, तेच क्षेत्र आपण निवडा, आपल्या आवडीच्या क्षेत्रात कोण-कोणत्या संधी उपलब्ध आहेत, तिथे करीअरच्या दृष्टीने कसा वाव आहे, त्या क्षेत्राचे भवितव्य नेमके कसे आहे याचाही विचार यावेळी होणे गरजेचे असते, अन्यथा आपण निवडलेल्या क्षेत्रात जर भविष्यात संधीचं नसतील तर कदाचित आपला निर्णय चुकू शकतो आणि मोठा फटका आपल्या करीअरला बसू शकतो, म्हणूनचं आपल्या यशस्वी भवितव्यासाठी योग्य निर्णय तितकाच महत्वाचा आहे.
सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्यवसाय करायचा आहे की नोकरी ? याचा विचार ठामपणे व्हायला हवा, आपण जर नोकरी करणार असाल तर आपणासमोर प्रचंड मोठी आव्हाने आहेत, मग आपल्याला ज्या क्षेत्रात मोठा वाव आहे, जिथे चांगला पगार मिळू शकतो, असे क्षेत्र आपण निवडू शकता, व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी पूरक अशा अनेक संधी किंवा अभ्यासक्रम सध्या शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध आहेत, त्यातही आपण कोणत्या प्रकारचा व्यवसाय निवडणार आहात, त्यात कोणते कौशल्य व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे याचाही विचार इथे होणे गरजेचे आहे, तरच आपला निर्णय इथे योग्य ठरेल अन्यथा इथेही मोठी स्पर्धा आणि मोठ्या आव्हानात्मक बाबी समोर आहेत याचाही विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनचं करीअरसाठी वाटा कोणत्याही निवडा, पण त्या आपल्या आवडीच्या असाव्यात, आपल्याला त्यात रस असेल तरच इथे आपल्याला शैक्षणिक बाबतीतही आणि करीअर बाबतीतही मोठे यश मिळू शकते, पण आपला एक निर्णय चुकला तर आयुष्यभर त्याचा पश्चाताप आपणावर करण्याची वेळ येईल हा धोकाही लक्षात घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत पुढे जा, आपल्या आयुष्यातील शैक्षणिक प्रवास हा अत्यंत महत्वाचा आणि काळजीचा आहे, इथे जर वाट चुकलात तर आपला मार्ग सुखकर होणे अवघड होवून बसते, म्हणूनच योग्य मार्ग निवडा, कधीच पश्चाताप होणार नाही, ध्येय समोर ठेवा, गाडी कधीच अडणार नाही, ठेवा जिद्द, संधी कधीचं हुकणार नाही !

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment