संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

टोयोटा हायरायडर स्पेशल एडिशनचे गाडवे यांच्या हस्ते पुण्यात लोकार्पण

SHARE:

वैविध्यपूर्ण फिचर्सने परिपूर्ण असलेली हायरायडर कार नुकतीचं पुण्यात लॉंच करण्यात आली आहे, याचा अनावरण सोहळा पुण्यातील सेनापती बापट रोड येथील शॉ टोयोटा या शोरुममध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध काका हलवाई स्वीट्स अँड नमकीनचे प्रमुख मकरंद गाडवे आणि सौ. नेहा मकरंद गाडवे यांच्या शुभहस्ते पार पडला.
टोयोटा हायरायडर अर्बन क्रुझर या नव्या नावाने नवीन फीचर्ससह अपग्रेड झाली आहे. ही कार ऑटोमॅटिक / मॅन्युअल ग्रेडमध्ये उपलब्ध असून, यामध्ये 8-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, विंडो सनशेड, सनरूफ शेड मटेरियल अपग्रेड, टायर मोबिलिटी किट – (टायर फ्लॅट झाल्यास जलद आणि सोपे दुरुस्ती करण्यास सक्षम), मोबाईल जलद गतीने चार्जिंग करण्यासाठी सी पोर्ट चार्जर, इंटिरिअर स्पॉट लॅम्प आणि रीडिंग लॅम्पसाठी एलईडी लाईट्स अशा आधुनिक पध्दतीने हीचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे, अशी माहिती शॉ टोयोटाचे सीओओ योगेश उपाध्ये यांनी यावेळी दिली.
हि कार 6 एसआरएस एअरबॅग्ज, वायरलेस चार्जर, ड्युअल टोन कलर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) डिस्प्ले अशा विविध फीचर्स ची माहिती मॅक्स ग्रुपचे एम.डी.सौरभ शॉ यांनी दिली. शॉ टोयोटाच्या सर्व शोरुम्स्‌‍मध्ये ही कार ट्रायलसाठी उपलब्ध आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment