संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

जेंव्हा आपल्यावर वेळ येते तेंव्हाच माणसे कळतात मदत बिदत सोडा राव, शेवटी आपलीच थट्टा मांडतात

SHARE:

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकचं गोष्ट सतत जाणवत राहीली, जवळ येणारा प्रत्येक माणूस फक्त फायद्यासाठी जवळ येत गेला, मी प्रत्येकाशी मनमोकळेपणाने वागत राहीलो, मनातलं सारं काही त्यांच्या समोर मांडत राहीलो, यातून प्रचंड मोठा मित्र परिवार उभा राहीला खरा, एकेक माणूस जोडत गेलो, परंतु यातूनचं अनेक हितशत्रूही निर्माण होत गेले, जवळ राहून माझ्याचं भावनांशी खेळत अनेकांनी पाठीत खंजीरही खुपसला, माझ्या नशिबात जेवढं आहे तेवढं मला मिळणारचं आहे, याचं भावनेतून जिद्द व चिकाटी ठेवत प्रामाणिकपणे मी माझे काम करीत राहीलो, यातूनचं प्रचंड आत्मविश्वास वाढत गेला, आलेल्या वाईट अनुभवांनी जगायला शिकवलं, पाठीत खंजीर खुपणाऱ्यांनी समाजात कसं वागावं याचे धडे दिले, त्यामुळे साहजिकच आयुष्याच्या या विद्यापीठात अनुभावांची पदवी घेत असताना मी कधीचं खचलो नाही, कधीही कोसळलो नाही, आलेल्या परिस्थितीशी नेहमीच संषर्घ करीत राहीलो,
यातूनच जवळच्याचं व्यक्ती माझ्या भावनिकतेचा गैरफायदा घेत गेल्या, मैत्रीत कर्तव्य निभावत गेलो, यातूनचं काही माणसं काळजात घर करुन राहीली तर काहींनी तळपायाची आग मस्तकात जाताना प्रचंड वेदनाही दिल्या, पण त्या वेदनांना कवटाळत मी कधीही नशीबाशी भांडत बसलो नाही, कारण मला मला माझ्या कर्मावर विश्वास होता आणि आजही कायम आहे.
चांगले कर्म करीत राहा, कधीचं वाईट होणार ही शिकवण समोर असल्याने माझे वाईट चिंतणाऱ्यांचेही देव भले करो, हीच प्रार्थना मी आयुष्यभर करीत राहीलो, माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाने मला जवळची माणसं ओळखायला शिकवलं. ज्यांना आपण अडचणीत मदत मागतो तीच माणसं आपल्या आयुष्यात अडचण निर्माण करतात, याचाही अनुभव अनेक वेळा घेतला, फायद्यासाठी सगळे जवळ येतात, पण अडचणीत कुणीही कुणाचा नसतो ही गोष्ट नेहमीच लक्षात राहीली.
त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार न करता आपण आपलं चालत राहीलं की यश आपोआप मिळत जातं, याचा अनुभव मी घेतला आहे, त्यामुळे असे अनुभव येणारचं हे गृहीत धरुनचं आपण जगणं शिकायला हवं, कारण जेंव्हा आपल्यावर वेळ येते तेंव्हाचं माणसे कळतात, मदत बिदत सोडा राव, शेवटी आपलीच थट्टा मांडतात ही वस्तुस्थिती आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment