संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

म्हणे मित्रांसोबत वेळ घालविण्याने आयुष्य वाढत जात दोस्तां सोबतच्या चर्चेनं दु:ख हलक होत! ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याने मैत्रीला महत्व येत

SHARE:

मित्रांमध्ये जास्त जाऊ नकोस, उगाच हुदडत बसू नकोसे असे शब्द आपण वारंवार ऐकले असतील, परंतु आता ब्रिटेन येथील ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीने केलेल्या एका वेगळ्या सर्व्हेचे रिपोर्टस्‌‍ ऐकून आपणही आवाक्‌‍ व्हाल आणि चला मित्रांसोबत वेळ घालवू, मस्त गप्पा मारु असा मुड आपलाही तयार होईल यात शंकाच नाही. कारण आपला मुड चांगला करण्यासाठी आपले मित्रचं फायदेशीर ठरु शकतात असा एक वेगळा स्टडी समोर आल्याने मैत्रीचे नाते आता नक्कीचं अधिक घट्ट होणार आहे यात शंकाच नाही.
होय, ब्रिटन येथील ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीने केलेल्या एका सर्व्हेत मित्रांसोबत फिरल्याने, गप्पा मारल्याने मन मोकळं केल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं आणि औषधांपासून माणूस दूर राहू शकतो असा दावा केला आहे, म्हणूनचं मैत्रीच्या या व्याख्येला आता एक व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
पूवचे लोक अनेकदा डायरी लिहायचे, आपल्या मनातील भावना कागदावर उतरुन ठेवायचे त्यामुळे त्यांच्या मनावरचं ओझं हलकं व्हायचं, त्यामुळे त्यांच्या मनावरचा ताण कमी व्हायचा असं अनेकदा आपण ऐकलं आहे, अर्थातचं मन मोकळं होणं गरजेचंं आहे, हीच बाब याही संशोधनातून देखील समोर आली आहे, सतत डिप्रेशन मध्ये राहील्याने माणूस खचतो,त्यामुळे शरीरावर ताण येवून आपली मानसिकता खालावू लागते, परंतु तेच मनात असलेलं टेंशन आपण इतरांसमोर मांडताना आपल्याला लगेचं हलकं वाटू लागतं,हीच बाब आता संशोधनातूनही समोर आल्याने मित्रांसोबतचं राहणं आता आरोग्यासाठीही फायदेशीर असणार आहे, पूव लोक म्हणायचे जास्त दडपण घेऊ नकोस, मोकळं राहा, तेच मोकळं राहणं आता फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मित्र जोडा, आपल्या मनातील दु:ख इतरांसमोर हलकं करा, त्यामुळे आपले डिप्रेशन, टेंशन नक्कीचं कमी होईल, आपल्या मनातील संकल्पनांना नक्कीचं वाव मिळेल. आपल्या मनातील टेंशन आपल्याला 15 सिगारेट ओढल्या सारखे नुकसान देते, तर एकटेपणा माणसासाठी सर्वात मोठा शत्रू आहे असेही या संशोधनात म्हटले आहे. 10 हजार लोकांवर प्रयोग करुन हे संशोधन समोर ठेवण्यात आले आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment