संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

9 जूनला शिरुरमध्ये महसूल विभागाची लोकअदालत होणार

SHARE:

शिरुर : शिरुर तालुक्यातील न्यायप्रविष्ट महसूल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने 9 जून रोजी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तहसिल कार्यालय, मंडल अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये नागरीकांनी दाखल केलेल्या विविध प्रकारच्या न्यायप्रविष्ट दाव्यांचा परस्पर संमतीने निपटारा करण्यात येणार असून तडजोडीच्या माध्यमातून दावे निकाली काढण्यात येणार आहेत, तहसिल संदर्भातील प्रलंबीत अर्ज, प्रमाण पत्रांसंबंधीच्या तक्रारी, फेरफार, जमाबंदी व इतर प्रशासकीय बाबी निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे, यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि.30 मे पर्यंत असणार आहे. ज्यांना यात सहभाग घ्यायचा आहे अशा नागरीकांसाठी tahsilshirur@gmail.com या ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment