संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

तालुका क्रीडा संकुल व नाट्यगृहाचा मार्ग मोकळा होणार आ.कटकेंच्या प्रयत्नांनी 17 एकर जागा पालिकेला परत मिळणार

SHARE:

शिरुर नगरपरिषदेची 17 एकर जागा काही कारणास्तव शासनाने हस्तांतरीत केली होती, या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके आणि शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या समवेत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत ही जागा पुन्हांदा शिरुर नगरपरिषदेला परत करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने आता शिरुर नगरपरिषदेच्या वतीने शिरुर शहरात उभारण्यात येणाऱ्या तालुका क्रीडा संकुल व नाट्यगृहाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या महत्वपूर्ण बैठकीत 17 एकर जमीन हस्तांतरणासह शिरुर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण चर्चा झाल्याने शिरुर शहरातील नागरीकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील तसेच अन्य संबंधीत अधिकारीही उपस्थित होते. शिरुर नगरपरिषदेचे तत्कालीन सत्ताधारी असलेले प्रसिध्द उद्योजक प्रकाशशेठ धारीवाल यांनी पुढाकार घेऊन शिरुर नगरपरिषदेच्या समोर असणाऱ्या 17 एकर जागेवर तालुका क्रीडा संकुल व नाट्यगृह उभारण्यासाठी ठराव संमत केला होता, परंतु काही कारणास्तव शासनाने ही जागा ताब्यात घेतल्याने या उपक्रमाला ब्रेक लागला होता, शिरुर शहराचा वाढता विस्तार विचारात घेता, तसेच शहराची गरज लक्षात घेता शिरुर शहरात तालुका क्रीडा संकुल व नाट्यगृह उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. ही जागा पुन्हा नगरपरिषदेला हस्तांतरीत होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने या जागेचा वापर तालुका क्रिडा संकुल, नाट्यगृह याबरोबरच शहरातील नागरी सुविधा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक उद्याने किंवा अन्य विकासकामांसाठी करता येणार आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment