संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

तालुका भाजपाच्या मंडल अध्यक्षपदी राहुल पाचर्णे यांची निवड पक्षवाढीसाठी शिरुर पूर्व भागाची जबाबदारी

SHARE:

भारतीय जनता पाट शिरुर तालुका मंडल अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुरावजी पाचर्णे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री व भारतीय जनता पाटचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
राहुल पाचर्णे माजी आमदार स्व.बाबुरावजी पाचर्णे यांचे चिरंजीव आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांची समाजाला अगदी जवळून ओळख आहे. माजी आमदार पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली. त्या दरम्यान राहुलदादा राजकारणात सक्रीय होतील अशी भाजपाच्या कार्यर्त्यांना अपेक्षा होती, मात्र वडीलांच्या निधनानंतर पाचर्णे कुटुंबयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यामुळे राहुलदादा लगेच राजकारणात सक्रीय झाले नाहीत, परंतु काही काळाने सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आपल्या वडीलांनी वाढविलेला जनसंपर्क पुढे कायम ठेवण्यासाठी व वडीलांच्या स्वप्नपूतसाठी त्यांनी पुन्हांदा आता राजकारणात सक्रीय सहभाग धेतला आहे, याचे स्वागत भारतीय जनता पाटच्या वरिष्ठ नेत्यांनेही केले आहे, शिरुर तालुक्यात भारतीय जनता पक्षाला एक वेगळे वलय निर्माण करुन देण्यात स्व.पाचर्णे यांचा सिंहाचा वाटा होता, हाच वारसा पुढे चालवत पक्षाला आणखी बळकटी मिळवून देण्यासाठी राहुलदादांनी पुढाकार घ्यावा याचं हेतूने बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाची तालुक्याची एक मोठी जबाबदारी आता राहुल पाचर्णे यांच्या खांद्यावर टाकल्याने त्यांच्या समर्थकांमधुन आता उत्साहाचे वातावरण आहे.
नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनाचं माजी आमदार स्व.बाबुरावजी पाचर्णे यांची उणीव जाणवली, परंतु आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्यात सहभागी होत राहुल पाचर्णे यांनी ही उणीव भरुन काढली होती. एक माणूसकी प्रधान माणूस आणि आपला माणूस म्हणून स्व.पाचर्णे यांची समाजाला अगदी जवळून ओळख होती, अशी ओळख निर्माण करण्यात राहुल पाचर्णे यशस्वी ठरतील काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाने त्यांच्यावर दिलेली ही जबाबदारी मोठी आहे, या संधीचे ते नक्कीचं सोने करतील अशी त्यांच्या समर्थकांना खात्री आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment