वाढते औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या,या अनुषंगानेच वाढते शहरीकरण यामुळे शिरुर तालुका आता विस्तारतोय,आर्थिकदृष्टया सक्षम बनतोय, म्हणूनच की काय आता इथला व्यावसायीकही आपल्या ब्रॅण्डला ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिध्दी माध्यमांचा पुन्हांदा जोरदार वापर करताना दिसून येतोय, व्हॉटस्,फेसबुक, सोशल मिडीयाकडे मध्यंतरी वळलेला ग्रामीण भागातील हा व्यवसायीक आता सोशल मिडीयावर मिळणाऱ्या अल्पप्रतिसादामुळे आता पुन्हांदा स्थानिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतो आहे. यामुळेच की काय ब्रॅण्डींगसाठी मार्केटींगची संकल्पना आता ग्रामीण भागातही रुजतेय, जाहीरात क्षेत्राला मिळतेय उभारी, स्थानिक वृत्तपत्रांनाही आता अधिक महत्व येतंय असं म्हणण्याची वेळ आली आहे. ही खरंच स्वागतार्ह बाब आहे. कमी खर्चातील उपाय आणि अदखलपात्र पत्रकाला पर्याय म्हणून आता स्थानिक वृत्तपत्रांकडे जाहीरातदारांचा अधिक कल दिसून येतो आहे,
सध्या ग्राहक परिपूर्ण जाहीरातीसाठी घरा-घरात पोहोचणाऱ्या वृत्तपत्राची निवड करताना दिसून येतात, शिरुर तालुका व परिसरातील 121 गावात संवाद वाहिनी या वृत्तपत्राचे वितरण होत असल्याने ग्राहक संवादला जाहीरातीसाठी प्रथम पसंती देत आहेत.








