कियाने नुकतीच आपली किया सिरोस ही नवीन एसयुव्ही कार बाजारात आणली आहे. या कारच्या वेगळ्या व आकर्षक लुकमुळे ही कार सर्वांचे आकर्षणकेंद्र ठरत आहे तर यातील विविध फिचर्समुळे ही कार सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
या कारमध्ये वायरलेस चार्जर, क्रुझकंट्रोल, सनरुफ, सीट व्हेंटीलेशन, इलेक्ट्रीकली ॲडजेस्टेबल ओआरव्हीएम, 30 इंची मोठी एलईडी स्क्रीन ज्यामध्ये 12.3 इंच टचक्रीन, 12.3 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले व 5 इंच क्लायमेट कंट्रोल पॅनेल, 8 हर्मन कार्डन स्पिकर सिस्टम, सुरक्षेसाठी खास 6 एअरबॅग्ज्, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम, फ्रंट आणि रेयर पार्कींग सेंसर, 360 डिग्री कॅमेरा, वायलेस मोबाईल चार्जिंग सपोर्ट असे आकर्षक फिचर्स या कारमध्ये असल्याने ही कार सध्या सर्व घटकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
या कारचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ही कार दिसायला छोटी वाटत असली तरी यामध्ये प्रशस्त स्पेस देण्यात आली आहे, जिथे पार्कींग अथवा ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम आहे अशा शहरांसाठी ही कार म्हणजे पर्वणीच ठरत आहे. ही कार टर्बो पेट्रोल इंजिन व डिझेल इंजिन या दोन्हीही पर्यायात उपलब्ध आहे.
या कारमध्ये बसल्यानंतर कम्फर्ट व आरामदायी फिल येत असल्याने देखील या कारला स्विकारले जात आहे. या कारमध्ये मोठी बुट स्पेस देण्यात आली आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत लॉंग ड्राईव्हला जाताना पूरेसे साहित्य सोबत ठेवणे शक्य होत असल्यानेही ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.








