भारतातील व्हेईकल क्षेत्रात टोयोटा हा प्रचंड लोकप्रिय ब्रॅंड आहे, किंबहुना या ब्रॅंडने गुणवत्ता, टीकाऊ पणा, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी एक जगप्रसिध्द कंपनी म्हणून आपला एक वेगळा लौकीक निर्माण केला आहे.
तसेच वाहन क्षेत्रातील आपले स्थान नेहमीच अबाधीत ठेवण्यात आणि आपली बाजारपेठेतील विश्वासार्हता कायम ठेवण्यात आजपर्यंत मोठे यश मिळविले आहे, म्हणूनचं टोयोटा वाहनाला भारतातून प्रचंड मागणी आहे. अशातच आता टोयोटाने इलेक्ट्रीकल वाहन क्षेत्रात पहिल्यांदाच अर्बन क्रुझर ईबेला या नव्या इलेक्ट्रीकल वाहनाच्या माध्यमातून एक दमदार एसयुव्ही कार बाजारपेठेत लॉंच केली आहे.
आकर्षक डिझाईन, 543 कि.मी.पर्यंतची हेवी रेंज, प्रवासी सुरक्षा विषयक अनेक अत्याधुनिक फिचर्स, अलिशान इंटीरीयर, स्मार्ट कनेक्टेड तंत्रज्ञान यामुळे ही एसयूव्ही भारतीय ईव्ही क्षेत्रातील एक महत्वाची स्पर्धक ठरणार आहे यात शंकाच नाही, त्यामुळे निश्चितच टोयोटाची ही नवी ईबेला ग्राहकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
यात ग्राहकांसाठी टोयोटाने दोन मॉडेल्स समोर ठेवले आहेत. यात पहिले 49 किलो वॅट बॅटरीचा जिचे ॲव्हरेज रेंज 440 कि.मी. पर्यंत आहे तर दुसरे 61 किलो वॅट बॅटरी जिचे ॲव्हरेज 543 कि.मी. पर्यंतचे असल्याचा दावा टोयोटा कंपनीने केला आहे.
या व्हेईलकलच्या 10 ते 80 टक्के चार्जिंगसाठी सुमारे 45 मिनीटे कालावधी लागत असल्यानेही ग्राहकांना ही ईव्ही भुरळ घालत आहे. या व्हेईकलसाठी 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 इंच टचस्क्रीन, क्लाऊ ड नेव्हीगेशन, व्हाईस कमांड, ओटीए अपडेटस्, 100 हून अधिक कनेक्टेड कार फिचर्स तसेच 7 एअर बॅग्ज्, एबीएस, 260 डिग्री कॅमेरा, हील होल्ड कंट्रोल, रिअर पार्कींग सेन्सर्स, मजबूत स्टिल, त्याचबरोबर ॲडास फिचर्समध्ये अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ॲटोमॅटीक इर्मजन्सी ब्रेकींग, ब्लाईंड स्पॉट मॉनिटरींग, टोयोटा आयकनेक्ट प्रणाली, हाय बीम असिस्ट असे विविध फिचर्स दिल्याने ही नवी ईव्ही सर्वांना भुरळ घालत आहे. किंबहुना या ईव्हीला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने सध्या या व्हेईकलसाठी वेटींग आहे.
-टोयोटाच्या या नव्या ईबेला ईव्हीची किंमत 23.60 लाख आहे तर इतर व्हेरीएंटनुसार किंमती बदलू शकतात
-49 किलो वॅट बॅटरीत ही ईव्ही 440 कि.मी. पर्यंतची रेंज देते
-61 कि.वॅट बॅटरीत ही ईव्ही 543 कि.मी.पर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे
-ईको, नॉर्मल आणि स्पोर्टस् असे ड्रायव्हींग मोड्स या ईव्हीसाठी उपलब्ध आहेत.
-या व्हेईकलमध्ये पाच मोनोटोन कलर्स तर चार ड्युयल टोन कलर्स असे एकुण 9 कलर्स उपलब्ध आहेत
-डिकीची जागा – सामान्य स्थितीत 238 लिटर आणि रीअर सिट पुढे केल्यानंतर 306 लिटर बुट स्पेस उपलब्ध होतो असा दावा कंपनीने केला आहे
-अपघातात होणारे नुकसान कमी करण्यासाठी या ईव्हीत इलेक्ट्रॉनिक्स स्टॅबिलीटी प्रोग्राम, हिल होल्ड असिस्ट, हाय टेन्सील स्टील बॉडी, रिअर पार्कींग सेंन्सर्स यासारख्या सुविधाही यात देण्यात आल्या आहेत
-8 वर्षांची बॅटरी वॉरंटी ग्राहकांना मिळणार आहे तसेच कंपनीकडे प्रशिक्षित ईव्ही तंत्रज्ज्ञ असल्याने कोणताही प्रॉब्लेम तत्काळ सोडविला जाणार आहे







