संवाद वाहिनीचा पुढील अंक 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -12 ऑगस्ट 2026

दिल्लीच्या आंदोलनाला कडकडीत बंद पाळून शिरुरकरांचा जाहीर पाठींबा हल्ल्याचा निषेध अन्‌‍ परीक्षा व्यवस्थे विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले !

SHARE:

इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम्‌‍, लाठीचार्जचा निषेध असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भीम अशा घोषणाबाजी करीत संतप्त झालेल्या नागरीकांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार आणि सातत्याने सुरु असलेली पेपरफुटीची मालिका याविरोधात शिरुर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शिरुर शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरीकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलन कर्त्यांना जाहीर पाठींबा दिला. या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी,नेते, व्यापारी,नगरसेवक तसेच शहरातील हजारो नागरीकांनी उत्फूर्तपणे सहभाग दर्शविला. यावेळी माजी आमदार ॲड.अशोक पवार यांच्यासह जगप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ स्वप्नील भालेकर यांनी अतिशय तीव्र शब्दात दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment