संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

पारंपरिक शेतीपध्दती आता कालबाह्य ठरतेय ए-आय तंत्रज्ञानामुळे शेती हायटेक होतेय शेतकरी बनतोय स्मार्ट, जागतिक बाजारपेठेत स्थान मिळतेय

SHARE:

भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेती आणि भारतीय संस्कृती यांचं एक अतुट नात आहे, त्यामुळे साहजिकच शेतकरी आपल्या शेतीला मायभूमी म्हणून आजपर्यंत जीवापाड जपत आला आहे, परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे पारंपरिक शेती आता धोक्यात आल्याने शेतीला आता ए आय सारखे आधुनिक तंत्रज्ञान अधिक प्रगल्भ करताना दिसून येत आहे. ए आय तंत्रज्ञानामुळे शेती अधिक स्मार्ट होते आहे तर यामुळे उत्पादन वाढीसह खर्चातही मोठी बचत होताना दिसून येत आहे.
काही वर्षांपूव शेती म्हणजे फक्त अनुभवावर आधारित निर्णय घेतले जात होते. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक अचूक, कमी खर्चिक आणि फायदेशीर होत आहे. हवामानाचा अंदाज, पिकांवरील रोग, पाण्याची गरज, खतांचे नियोजन आणि बाजारभाव याची माहिती आता मोबाईलवर मिळू लागली आहे.
एआय म्हणजे संगणक आणि आधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करणारे तंत्रज्ञान. त्यामुळे अंदाजाऐवजी माहितीच्या आधारे शेती करणे शक्य झाले आहे.
पावसाळ्यात सर्वाधिक उपयोग
पावसाळ्यात एआयचे महत्त्व अधिक वाढते. पाऊस कधी पडणार, किती पडणार किंवा अतिवृष्टीची शक्यता आहे का, याचा अंदाज आधीच मिळाल्याने पेरणी, खत व्यवस्थापन आणि औषध फवारणीचे योग्य नियोजन सहज करता येते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जातो आणि पिकांचे नुकसान कमी होते.
शेतीमध्ये एआयचा वापर नेमका कुठे होतो?
-मातीची तपासणी करून योग्य खतांचा सल्ला घेणे
-जमिनीतील ओलावा मोजून आवश्यक तेव्हाच सिंचन.
-ड्रोनद्वारे जलद आणि अचूक औषध फवारणी शक्य
-पिकावरील रोग किंवा किडीची लवकर ओळख.
-उत्पादनाचा आणि बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी
-फळबागांचे स्मार्ट व्यवस्थापन
या सर्व ठिकाणी एआयचा वापर प्रामुख्याने दिसून येतो
भारतात कुठे वापर वाढतो आहे?
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये एआय आधारित शेतीचा वापर वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रातील बारामती, नाशिक, सातारा आणि पुणे परिसरात द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि भाजीपाला पिकांमध्ये ड्रोन, स्मार्ट सिंचन आणि डिजिटल कृषी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्येही अनेक शेतकरी मोबाईल ॲप, सेन्सर आणि एआयच्या मदतीने शेती करत आहेत.
एआय मुळे शेतकऱ्याला होणारे थेट फायदे
-उत्पादन वाढण्यास मदत.
– पाणी, खत आणि औषधांची बचत.
-कीड व रोगांचे लवकर निदान.- मजुरीचा खर्च कमी.
-हवामानाचा अचूक अंदाज.
– बाजारभावाची माहिती मिळाल्याने योग्य वेळी विक्री.
– शेती अधिक नफ्याची आणि शाश्वत.
– भविष्यातील शेती स्मार्ट असेल
कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, सेन्सर, उपग्रह आणि इंटरनेट यांचा एकत्रित वापर करून भविष्यातील शेती स्मार्ट व अत्याधुनिक होणार आहे. बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी एआय हे शेतकऱ्याचे विश्वासू मार्गदर्शक ठरत आहे
शेतकरी बांधवांनो आता लक्षात ठेवा
-मोबाईलवरील हवामान ॲपचा वापर करा.
-माती परीक्षण नियमित करा4गरजेनुसारच सिंचन करा.
-ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय जाणून घ्या4कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्या.
एकुणच अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तरच शेती अधिक उत्पादनक्षम आणि नफ्याची ठरेल.“ यात शंकाच नाही

पूर्वीचा शेतकरी साधा भोळा होता, त्यामुळे पारंपरिक पिकाकडे त्याचा कल असायचा, परंतु आताचा शेतकरी अधिक हायटेक आणि एक्स्पर्ट झाला आहे, अगदी अशिक्षित शेतकरीही एखाद्या बीएस्सी ॲग्री होतकरु शेतकऱ्याप्रमाणे आपली शेती करु लागला आहे. ए आय तंत्रज्ञानामुळे आता शेतीची व्याख्या बदलते आहे, निसर्गाचा लहरीपणा आणि रासायनिक खतांचा शेतीमध्ये होणारा वाढता वापर यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असताना आता एआय तंत्रज्ञानाने आधुनिक शेतीला चालना मिळत असल्याने शेतकऱ्याला आता जागतिक बाजार पेठेत स्थान मिळत आहे

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment