संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

सरदवाडीचे शिक्षक संदीप सरोदे यांना पंडीत दिनदयाळ विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी

SHARE:

सरदवाडी : अभिनव विद्यालय, सरदवाडी येथील आदर्श शिक्षक संदीप किसनराव सरोदे यांना पंडीत दिनदयाळ विद्यापीठाची मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर झाली आहे. 26 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे हा पदवी प्रदान समारंभ होणार आहे. संदीप किसनराव सरोदे एक अभ्यासू व हरहुन्नरी शिक्षक म्हणून प्रख्यात आहेत. सध्या अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे आपल्या ज्ञानदानाचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत,गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. एकुणच विद्याथ हिताच्या दृष्टीने ते नेहमीच सक्रीय असतात म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात पोषक वातावरण टिकवून ठेवण्यात आणि विद्याथ हितासाठी पुढाकार घेताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत रुची निर्माण करणे यासाठी सरोदे सरांचे योगदान मोठे आहे, म्हणूनच सरोदे यांना मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. साप्ता.संवाद वाहिनीच्या वतीनेही सरांचे मनापासून अभिनंदन !

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment