अलिकडच्या काळात सर्वच भागातून समोर येत असलेली प्रचंड मंदीची लाट आणि यामुळे बाजरपेठेवर झालेला मोठा परिणाम यामुळे व्यापारी वर्गातून सातत्याने चिंतेचे वातावरण होते, संपूर्ण देशभरातूनच खरेदीदारांची संख्या घटल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवत होता, त्याचा फटका शिरुर तालुका व परिसरातील व्यावसायीकांनाही सहन करावा लागत होता ही वस्तुस्थिती असतानाच आता दसरा-दिवाळी या सणांची लगबग सुरु झाल्याने अलिकडे ग्राहकांचा ओघ खरेदीकडे वाढल्याने आता मार्केट नक्कीचं सुरळीत होईल अशी अपेक्षा ठेवत आपल्या दुकानात नवनवीन व्हरायटीज्सह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी व व्यावसायीक विविध योजनाही समोर ठेवताना दिसत आहेत,
त्यामुळे साहजिकच दसरा-दिवाळी या सणांच्या निमित्ताने बाजार पेठेत आता क्वालिटी व व्हरायटीजसाठी विविध दुकांनामध्ये स्पर्धा सुरु असल्याचे चित्र अनुभवायला मिळत आहे, त्यामुळे साहजिकचं बाजारपेठ सुरळीत झाल्याने व्यापाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या, ग्राहकांचाही वाढला ओघ, सणांची लगबग व विविध व्हरायटीजमुळे पेठाही सजल्या, असेच काहीसे चित्र शिरुर तालुका आणि परिसरातील बाजारपेठेतही अनुभवायला मिळत आहे.वास्तविक पाहता शिरुरची बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. शिरुर , श्रीगोंदा व पारनेर या तिन्हीही तालुक्याची मुख्य बाजारपेठ म्हणून शिरुरची एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी ग्राहकांचा नेहमीच मोठ्या प्रमाणात ओढा असतो, सोन्याची बाजारपेठ असो, वा कपड्याची, वा असो किराणा खरेदी तसेच इतर कोणतीही खरेदी यासाठी ही बाजारपेठ प्रसिध्द असल्याने तिन्हीही तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. जागतिक मंदीच्या काळातही संपूर्ण महाराष्ट्राच्या
बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला होता, परंतु शिरुर तालुक्याच्या बाजारपेठेवर त्याचा अल्पसा परिणाम जाणवला, मात्र त्याची झळ बाजारपेठेला अधिक प्रमाणात बसली नव्हती, सुरुवातीला झालेली नोटबंदी, नंतरची जीएसटीची जाचक करप्रणाली आणि त्यानंतर कोरोनाच्या महामारीनं तब्बल दोन वर्षे थांबलेल्या बाजारपेठा यामुळे संपूर्ण शिरुर तालुका व परिसराची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे कोलमडली होती, संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते, ग्राहकांची खरेदी करण्याची मानसिकता घटली होती. लोकांचा पैसा साठविण्याकडे कल वाढू लागला होता. भविष्यात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होवू शकते म्हणून अनेकांनी आपल्या जवळील पैसा खर्च करण्याचे टाळले होते, त्यामुंळे साहजिकच गतीमान झालेल्या बाजारपेठा अचानक थांबल्याने उद्योग-व्यावसायीक व व्यापारी प्रचंड हैरान झाले होते, अनेकांचे बॅंकांचे हप्तेही जाणे कठीण झाले होते, आवक-जावक थांबल्याने बाजारपेठेला स्मशान शांततेचे स्वरुप लाभले होते. अशीच परिस्थिती कायम राहीली तर फार वाईट स्थिती निर्माण होईल या भीतीने व्यापारीही हैरान झाला होता, आता मात्र केंद्र सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी हटवला तर काहींचा जीएसटी दर कमी केल्याने आता ग्राहकांचा खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे, एकुणच शिरुर, श्रीगोंदा व पारनेर परिसरातील बाजारपेठांची अत्यंत दयनीय अवस्था असतानाच आता जीएसटी दर कमी झाल्याने विविध सणांच्या निमित्ताने लोक हळू हळू बाजारपेठांकडे खरेदीसाठी वळू लागल्याने एक आशादायी चित्र पुन्हा निर्माण झाले आहे. दिवसभर शेकडो ग्राहक अनुभवणाऱ्या दुकानांमध्ये फक्त 5-6 ग्राहक येऊ लागले होते, मात्र आता सर्वच दुकानांमधुन काही प्रमाणात का होईना पण गद अनुभवायला मिळत आहे, त्यामुळे साहजिकच शिरुर तालुका व परिसरातील
व्यापाऱ्यांच्या आशा नक्कीच उंचावल्या आहेत, आता दसरा आणि दिवाळीची व्यापाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे, त्यामुळे बाजारपेठेत विविध व्हरायटीजच्या वस्तू उपलब्ध झाल्याने आता ग्राहकही मोकळेपणाने सर्व टेंशन बाजूला सारुन खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत, त्यामुळे साहजिकच यंदाचा दसरा-दिवाळी हा सण व्यावसायीकांसाठी निश्चितच चांगला जाईल असे आशादायी चित्र सध्यातरी पहायला मिळत आहे. त्यामुळे विविध व्हरायटीजचा माल ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता व्यावसायीकांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे साहजिकच आता मात्र सारं काही सुरळीत होईल, व्यावसाय जोर धरेल अशी चर्चा बाजारपेठेतून होवू लागल्याने शिरुरची बाजारपेठ आता नक्कीच पुर्ववत होईल यात शंकाच नाही.








