संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

निरोगी जीवनासाठी पुरेशी झोप महत्वाची विसरा मानसिक त्रास, काळजी घ्या आरोग्याची!

SHARE:

आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक युगात आपण प्रत्येकजण प्रचंड बिझी झालोय. कामाचा इतका प्रचंड ताण आहे की, दिवसातले 24 तासही कमी पडतील इतकं प्रचंड टेंन्शन उद्योग, व्यावसायीक व सर्वसामान्यांसमोर आहे. म्हणूनचं अवेळी जेवण, मानसिक त्रास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न होणारी पूरेशी झोप,
यामुळे सध्या आरोग्याच्या मोठ्या समस्या आता डोकेवर काढू लागल्या आहेत, यात डायबिटीस, ब्लडप्रेशर, हृदयविकार या मुख्य समस्यांनी तर मानवी शरीराचा कब्जाच घेतला आहे. म्हणूनच आपलं दैनंदिन जीवन सांभाळताना आरोग्याकडेही तितक्याच बारकाईने लक्ष्य देणे गरजेचं आहे. चांगलं आरोग्य पाहीजे असेल
तर साहजिकच पूरेशी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. पूरेशी झोप हा आरोग्यपूर्ण जीवनाचा गुरुमंत्र आहे. त्याचबरोबर योग्य व वेळेत आहार घेणेही महत्वाचे आहे, परंतु ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेची असूनही याकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होतं, झोपही शांत असायला हवी, काहींना सहा ते सात तास तर
काहींना आठ तास झोप हवी असते. काहींना 10 तास झोप घेवूनही ताजेतवाने वाटत नाही. वास्तविक पाहता झोपण्याच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तीला पडल्या पडल्या किमान अर्धा तासात झोप लागायलाच हवी हा झोपेचा नियम आहे.

-किमान सात ते आठ तासांची झोप शरीराला आवश्यक आहे यामुळे शरीर ताजेतवाने व सदृढ राहण्यास मदत होते
-झोप शांत, गाढ व स्थिर असायला हवी.
-झोपेच्या दोन तास आधी मन:स्थिती चांगली ठेवावी. झोपेआधी किमान दहा मिनीटे मेडीटेशन करावे शांत झोप लागते
-चहा, कॉफी, अंमली पदार्थांचे सेवन करु नका यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो
-झोपेपूव किमान तासभर आधी टीव्ही, मोबाईल वापरू नये
-दिवसातून किमान 30 मिनीटे व्यायाम करा, यामुळे शरीरातील ऊ र्जा टीकून राहते
-जेवणानंतर किमान दहा ते बारा वेळा जिना चढा आणि उतरा यामुळे साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते
-झोपेच्या किमान दोन तास आधी जेवण करा.
-रात्रीच्या जेवणात अतिरिक्त मसालेदार, तेलकट पदार्थ टाळा.
-झोपणे आणि उठण्याच्या वेळा निश्चित करा.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment