संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

व्यवसायाचे योग्य नियोजन करा प्रामाणिक राहा,अलर्ट व्हा, नक्कीचं फायदा होईल आरोग्याची काळजी घ्या, टेंन्शन निघून जाईल

SHARE:

– रोजच्या दैनंदिन कामांचे योग्य नियोजन करा, त्याचा क्रम ठरवून घ्या
– जेवणाच्या वेळा ठरवून घ्या, सकाळी आंघोळीनंतर पोटभर जेवण करा, दुसरे जेवण रात्री लवकर घ्या यात अधिक खंड पडू देऊ नका
– शक्यतो तेलकट पदार्थ टाळा, बाहेरील पदार्थ खाणे शक्य तितके टाळा, घरच्या जेवणाला पसंती द्या
– बाहेर खाण्याची वेळच आली तर ताजे पदार्थ खाण्याचा आग्रह ठेवा
– व्यवसायात जेवढे पेलवेल तितकेच कर्ज घ्या, जेवढी कामे झेपतील तेवढीच कामे हाती घ्या
– कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करा, ग्राहकांना खोटी आश्वासने देवू नका, त्यांना वेळेत कामे द्या
– एखाद्या गोष्टीचे खुप टेन्शन आल्यास ते रिलीफ करण्यासाठी त्यावर कोणता चांगला मार्ग आहे याचा सकारात्मक विचार करा
– कोणत्याच गोष्टीचे टेंन्शन घेवू नका मात्र हाती घेतलेल्या कामाचे टेंन्शन नक्की असू द्या कारण ते आपल्याला वेळेत पूर्ण करायचे आहे
– भुक लागल्यानंतर पहिले खाण्याला प्राधान्य द्या, उगीच भुक नसताना खाऊ नका
– रागावर नियंत्रण ठेवा, ज्यावेळी एखाद्याचा खुप राग येतो तेंव्हा तो राग घालविण्यासाठी इतर गोष्टीत मन रमवा
– सकाळी किमान 45 मिनीटे चाला, संध्याकाळीही चालण्यासाठी 45 मिनीटांचा वेळ नक्की काढा
– ऑफिसमध्ये बैठे काम असेल तर प्रत्येक अर्धा तासाने उठून थोडेसे चाला,जेवणानंतर दोन तासांनी नक्की एखादा फेरफटका मारा
– आयुष्यात स्वत:च्या आरोग्यासाठी थोडे पैसे दर महीन्याला नक्की बाजूला काढून ठेवा
– संपूर्ण कुटुंबाचा एखादा आरोग्य विमा नक्की काढा
– आपल्याला मोठी हेल्थ पॉलिसी शक्य नसल्यास अगदी छोट्या छोट्या प्रिमियमच्या देखील हेल्थ पॉलिसीज बाजारपेठेत उपलब्ध आहेत त्या नक्की काढा, त्याचा नक्कीच फायदा होईल
– नेहमी सकारात्मक विचार करा, निगेटीव्ह गोष्टी कधीच मनावर घेवू नका, सकारात्मकतेचा नेहमीच विचार समोर ठेवा
– आपल्याला व्यवसायात नक्कीच यश मिळणार आहे याबाबत प्रचंड आत्मविश्वास बाळगा
– रोज किमान पाच 20 मिनीटे मेडीटेशन करा, नेहमी आनंदी राहा, हसत राहा
– नेहमी वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न समोर ठेवा
– कधीही खोटे बोलू नका, नेहमीच पादर्शक राहा
– खोटे दावे कधीही ग्राहकांसमोर ठेऊ नका, चुक झाल्यास नेहमीच मान्य करायला शिका
– आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते कधीही थकून देऊ नका, कधीही आपला चेक बाऊ न्स होऊ देऊ नका
– सर्वांशी आपले व्यवहार नेहमीच चांगले ठेवा, व्यावहारिक राहा, व्यावहारिक वागा या गोष्टी आपण आयुष्यात पाळल्या तर नक्कीच आपण प्रगती कराल, खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या तर कधीही आजारी पडणार नाही, व्यायाम केला तर नक्कीच प्रतिकारशक्ती कायम चांगली राहीलं, यामुळे आपण तितक्याचं जोमाने काम करु शकाल, जोमाने काम केले तर नक्कीच प्रगती होईल यात शंकाच नाही.

आपण चांगलं आयुष्य जगण्यासाठी धडपड करतो, पळापळ करतो, मोठं होण्याचं स्वप्न समोर ठेवत नुसतंच पळत राहतो,पण ज्या शरीरासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो, त्या शरीराची मात्र कधीच काळजी घेत नाही. आपल्या दैनंदिन जगण्यातील खुप छोट्या छोट्या गोष्टी आपण सहजपणे पाळल्या तर खरं सांगतो आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगता येईल. ना टेंन्शन येईल. ना आरोग्याची समस्या समोर राहीलं,म्हणूनच चांगलं आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच या गोष्टी सांभाळा…नक्कीच टेंन्शनमुक्त राहालं

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment