शिरुर : विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर उध्वस्त केलेल्या अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करुन तातडीने जैन मंदिराचे पुर्ननिर्माण करावे अशी मागणी शिरुर येथील सकल जैन समाज व विविध संस्थांच्या वतीने प्रांताधिकारी पूनम आहेर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना, कपिल बोरा, सुनील बोरा, माजी मुख्याध्यापक अनिल जैन, बँकेचेे माजी अधिकारी नंदकुमार पिंजरकर आदि मान्यवर उपस्थित होते. जैन मंदिर,तीर्थक्षेत्र,स्थानक भारतीय संस्कृतीचे भूषण आहे, जैन समाजाने देशाच्या उन्नतीसाठी बहुमोल असे योगदान दिले आहे, जैन समाज शांतताप्रिय व अहिंसक मार्गाचा अवलंब करणारा आहे, म्हणूनचं त्यांना न्याय हवा आहे.
Author: Sanvad Vahini
Post Views: 167








