संवाद वाहिनीचा पुढील अंक 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -12 ऑगस्ट 2026

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धनश्री गव्हाणे यांचे औषध निरीक्षक म्हणून मोठे यश !

SHARE:

पाबळ : शिरुर तालुक्यातील पाबळ (थापेवाडी) येथील सौ.धनश्री निळकंठ गव्हाणे (पुंडे) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत औषध निरीक्षक म्हणून मोठे यश संपादन केले आहे. सौ.धनश्री यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
वास्तविक धनश्री गव्हाणे या शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या सुविद्य पत्नी असून शिक्रापूर येथील प्रसिध्द उद्योजक व कान्हूर मेसाई शिक्षण संस्थेचे संचालक सदाशिव पुंडे यांच्या त्या कन्या आहेत. धनश्री यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिक्रापूर येथून पूर्ण झाले असून सिंहगड कॉलेज,पुणे येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. कुटुंब सांभाळून मोठ्या जिद्द व चिकाटीने त्यांनी अभ्यास करुन मुंबईमध्ये ड्रग्ज्‌‍ रेग्युलटरी अफेअर्स तसेच सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही नोकरीचा भार सांभाळला. सध्या त्यांचे औषध निर्माण शास्त्रात पी.एच.डीचे शिक्षण सुरु आहे. शिरुर तालुक्याची सून आणि तालुक्याची लेक म्हणून सर्वांना धनश्री यांच्या या यशाचा नक्कीचं सार्थ अभिमान आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment