संवाद वाहिनीचा पुढील अंक 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -12 ऑगस्ट 2026

उरळगांव-न्हावरा वीजप्रश्नासाठी 5 एम.व्ही.ए. पॉवर व 11 केव्ही लिंक लाईन उभी राहीली आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने विजेची चिंता मिटली

SHARE:

शिरुर तालुक्यातील उरळगांव, न्हावरा, आलेगांव पागा या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अपुरा वीजपुरवठा, होल्टेज समस्या, सिंगल फेजिंगचा प्रश्न अशा असंख्य वीज प्रश्नांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरीक अक्षरश: हैराने झाले होते, याचीच दखल घेत शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊ र्फ माऊ ली कटके यांनी महावितरणकडे या प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ न आता प्रत्यक्षात 5 एम.व्ही.ए. पॉवर रोहीत्र व 11 केव्हीच्या 6 कि.मी. लिंक लाईन उभी राहीली आहे याचेच लोकार्पण नुकतेच आमदार कटके यांच्या हस्ते न्हावरे येथे पार पडले. ही योजना शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 अंतर्गत उभी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दोन कृषी वाहिन्या सुरु करण्यात येणार असून एक वाहिनी उरळगांव परिसरात तर दुसरी वाहिनी न्हावरे-कोळपेवस्ती, निंबाळकर वस्ती, आलेगांव पागा या भागातील रोहीत्रांना वीजपुरवठा करणार आहे.
या योजनेमुळे नागरीकांना शेतीसाठी मुबलक वीजपुरवठा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि विकासाला गती देणे हा महायुती सरकारचा उद्देश आहे. यादृष्टीने अशा विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे अशी भावना आमदार कटके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या नव्या रोहीत्र आणि लिंकलाईनमुळे उरळगांव-न्हावरा आणि आलेगांव या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याने या योजनेचे परिसरातून स्वागत व कौतुक होत आहे.

नव्या व्यवस्थेमुळे सध्या कार्यरत असलेल्या 10 एम.व्ही.ए.पॉवर रोहीत्रावरील भार कमी होऊ न सुमारे 200 ॲंम्पियरचा अतिरिक्त भार नव्या रोहीत्रावर वर्ग होणार असल्याने या भागातील वीजपुरवठा अधिक स्थिर, अखंडीत, दर्जेदार होणार आहे. हंगामी कालावधी वगळता शेतकऱ्यांना दिवसा कृषी वीजपुरवठा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. तसेच सिंगल फेजिंगची समस्या कमी होऊ न घरगुती वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment