संवाद वाहिनीचा पुढील अंक 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -12 ऑगस्ट 2026

शालेय बससाठी नवीन नियमावली, विद्याथ सुरक्षिततेला दिले प्राधान्य, डॉ.बाबा शिंदे यांची माहिती

SHARE:

पुणे : राज्यशासनाने 16 जुलै 2026 रोजी प्रसिध्द केलेल्या नवीन परिपत्रकानुसार शालेय विद्याथ वाहतुकीसाठी महत्वपूर्ण नियम लागू करण्यात आले असून याची कडक अंमलबाजवणी करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. यानुसार विद्याथ वाहतुक करणाऱ्या शालेय कॉन्ट्रॅक्टर किंवा संस्थेचे ड्रायव्हर व अटेंडन्ट यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच सर्व रेकॉर्ड परिवहन विभागाकडे सादर करणे आता बंधनकारक असणार आहे. शालेय विद्याथ वाहतुक करणाऱ्या सर्व बसेसचे रोजच्या रोज वेळा, किलोमीटर यांचे रेकॉर्ड आरटीओ पुणे यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी स्कूल विद्याथ वाहणाऱ्या बसेस, व्हॅन करीता 15 वर्षांचे परमिट आयुष्यमान ग्राह्य धरले जात होते, आता मात्र ही मर्यादा 20 वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता वाहनामध्ये व्हिएलटीडी, लोकेशन ईक्विपमेंट, फायरडिटेक्टर अलार्म, फायर बेल,सीसीटीव्ही, क्लोज सर्कीट टीव्ही,व्हिडीओ बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती आरटीचे माजी सदस्य डॉ.बाबा शिंदे यांनी दिली.

 

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment