न्हावरे : सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि बाजारपेठेत शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव यामुळे हैरान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती, यानुसार 30 जून पर्यंत कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिले होते, परंतु आता मात्र जूनचा हा मुहूर्त हुकला आहे. मात्र या निर्णयावर राज्यपालांची सही बाकी असल्याने प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी 5 जुलै पासून सुरुवात होणार आहे अशी ग्वाही कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत दिली. या योजनेसाठी 2 हजार कोटी रुपयांची भरीव स्वरुपाची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीच्या प्राथमिक अंदाजानुसार 56 हजार शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे तर यासाठी 36 हजार 585 कोटी रुपयांची रक्कम लागणार आहे. मात्र आता 30 जूनचा मुहूर्त हुकल्याने शेतकऱ्यांना आता पुन्हांदा 5 जुलै या नव्या तारखेची आस लागली आहे. बळीराजाच्या नशिबी नेहमीच संघर्ष दिसून येतो, मात्र लाखोंचा हा पोशिंदा कधीही हार मानत नाही, याचा खरचं सर्वांना सार्थ अभिमान आहे.







