संवाद वाहिनीचा पुढील अंक 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध होईल, जाहिरात स्वीकारण्याची अंतिम तारीख -08 जुलै 2026

बाजार समितीच्या रणांगणात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आजी-माजी आमदार भिडले,पसंती सक्षम उमेदवाराला सत्तेच्या बाजूने झुकतोय कल, म्हणे चालना मिळेल विकासकामाला

SHARE:

आमदारकीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणुक होत असल्याने माजी आमदार ॲड.अशोक पवार आणि विद्यमान आमदार ज्ञानेश्वर
ऊ र्फ माऊ ली कटके यांनी यंदाची निवडणुक अधिक प्रतिष्ठेची केल्याने बाजार समितीच्या या रणांगणात असंख्य दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. तर आजी-माजी आमदार थेट एकमेकांसमोर भिडल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना या निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता प्रचाराला चांगलीच रंगत आल्याचे चित्र सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. एकुणच बाजार समितीच्या या रणांगणात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, आजी-माजी आमदार भिडले,पसंती सक्षम उमेदवाराला, सत्तेच्या बाजूने झुकतोय कल, म्हणे चालना मिळेल विकासकामाला अशीच काहीशी परिस्थिती सध्यातरी समोर आहे त्यामुळे या निवडणुकीत नक्की काय घडणार ? कोणाचे पारडे जड ठरणार ? माजी आमदार पवारांचे नक्की काय होणार ? आमदार कटके भरघोस यश मिळविणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एवढे मात्र निश्चित !
वास्तविक पाहता तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीसाठी प्रथमच विक्रमी संख्येनेे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 267 उमेदवारांमधून सक्षम उमेदवारांची निवड करुन आपला पॅनल भक्कम कसा होईल याकडे माजी आमदार ॲड.पवार आणि विद्यमान आमदार कटके दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, सध्या बाजार समितीच्या माध्यमातून असंख्य विकासकामे सुरु आहेत. आताच्या सक्षम उमेदवारांमध्ये शशिकांत दसगुडे यांनी बाजार समितीचे सभापतीपद भूषवून बाजार समितीत असंख्य विकासकामे उभी केली आहेत, ही देखील या पॅनेलच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. एकुणच सक्षम उमेदवारांची निवड, अनुभवी व्यक्तींचा पॅनेलमध्ये झालेला समावेश, विकासकामांचा अनुभव असलेल्या सक्षम स्थानिक नेत्यांना या पॅनेलमध्ये मिळालेली संधी, शेतकरी हितासाठी आणि बाजार समितीच्या सर्वांगीण विकासाची महायुतीच्या नेत्यांमध्ये असणारी तळमळ, सत्तेतला पक्ष असल्याने निधी आणण्यात न येणारी अडचण यामुळे साहजिकच महायुतीचे पारडे सध्यातरी जड असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार ॲड.अशोक पवार यांनी असंख्य स्थानिक नेते व पुढाऱ्यांची वेळोवेळी ओढवून घेतलेली नाराजी, आपल्या सत्तेच्या कार्यकालात त्या त्या भागातील पुढाऱ्यांना रोखण्यासाठी केलेला प्रयत्न यातूनच वाढत गेलेली नाराजी याचाही फायदा आमदार कटके यांना झाला. शेवटी त्या त्या भागातील स्थानिक नेतृत्वांचा कल आमदार कटके यांच्या बाजूने झुकत गेला, त्यात आमदार कटके राष्ट्रवादी कॉंग्रेसअजितदादा गटाचे आमदार असल्याने अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचेही शिरुरकरांवर असणारे विशेष प्रेम याचाही फायदा वेळोवेळी आमदार कटके यांना पूरेसा निधी मिळविण्यासाठी होत गेल्याने ही देखील त्यांच्या नेतृत्वाच्या दृष्टीने जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे.
याचाही प्रभाव या निवडणुकीत सातत्याने दिसून येत आहे. बाजार समिती शेतकरी हितासाठी काम करते, किंबहुना शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी असणारी संस्था सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असावी असाही एक सूर मतदारांमधुन समोर येताना दिसत आहे, त्यामुळे साहजिकच सध्या गावा-गावातून आणि वाड्या वस्त्यांमधुन महायुती शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार यंत्रणेत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. माजी आमदार पवारांनी आपल्या छुप्या राजकीय नितीने माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांना आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळविले आहे, मात्र या राजकीय खेळीचा त्यांना कितपत फायदा होईल हे निकालानंतरचं स्पष्ट होईल एवढे मात्र निश्चित !

-बाजार समितीच्या आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये जनमताचा कौल नेहमीच सत्तेच्या बाजूने राहीला आहे, यंदाही विकासकामांना गती द्यायची असेल तर आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या बाजूने ठामपणे उभे राहीले पाहीजे अशी भावना मतदारांमधुन समोर येत असल्याने महायुतीच्या पॅनेलचे पारडे निश्चितच जड असल्याचे बोलले जात आहे
-बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,बाजार समितीचे माजी संचालक राहुल गवारी, संतोष मोरे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, युवा नेते स्वप्नील गायकवाड,सागर दंडवते, राजेश लांडे, सुहास मलगुंडे, प्रमोद पऱ्हाड, संभाजी कर्डीले, संतोष फक्कडराव शिंदे, प्रतिभा बाळासाहेब नागवडे, सुजाता राजेंद्र नरवडे, विजय किसनराव ढमढेरे, वैष्णव इसवे आदिंच्या उमेदवारीने महायुतीची बाजू नक्कीच बळकट झाल्याचा दावा आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊ ली कटके यांच्या समर्थकांनी केला आहे, त्यामुळे या निवडणुकीत नक्की काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanvad Vahini
Author: Sanvad Vahini

Leave a Comment